प्रशासन

नागपूरचे सीपी IPS Ravinder Singal राष्ट्रपती पदक मिळवून झाले सिंघम 

अभिमानानं उंचावली Nagpur Police दलाची मान

Author

नागपूर शहर पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण आला आहे, कारण शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी आणि उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी नियंत्रणासाठी, आणि नागरी सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय योगदानाचे प्रतीक आहे.

डॉ. सिंगल यांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक नाही, तर नागपूर पोलीस विभागाच्या संघटित प्रयत्नांचा गौरव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आणि नागरी सुरक्षेत महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या.

बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेने अत्याचार केला नसल्याचा Jitendra Awhad यांचा दावा 

विशेष कार्य आणि उपक्रम

फेब्रुवारी 2024 मध्ये नागपूर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर, डॉ. सिंगल यांनी अनेक उपक्रम सुरू केले. अँटी-ड्रग्ज मोहीम अंतर्गत शहरातील ड्रग्ज विरोधात ऑपरेशन थंडर कठोर कारवाई केली. सायबर गुन्ह्यांविरोधात जागरूकता आणि सुरक्षा उपाय राबवले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पावले उचलली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित SIMBA कार्यक्रमाद्वारे गुन्हेगारी नियंत्रण व नागरी सुरक्षेत सुधारणा केली.

डॉ. सिंगल यांनी नागपूरमधील सण, उत्सव, गर्दी व्यवस्थापन आणि उच्चस्तरीय सुरक्षा यांचा प्रभावीपणे सांभाळ केला आहे. त्यांनी ट्रॅफिक नियमन, आपत्ती व्यवस्थापन, आणि नागरीकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.

रविंद्र सिंगल यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UNMIK) कोसोव्हो मिशनमध्ये सेवा बजावली आहे. त्यांनी गुप्तचर विभाग, KFOR, आणि अमेरिकन लष्कराशी समन्वय साधून विविध गुन्ह्यांची यशस्वी हाताळणी केली.

प्रदीर्घ अनुभव

1996 च्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. सिंगल हे मूळचे हरियाणाचे असून त्यांनी दिल्ली येथील अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (GAIL) इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून कार्य केले. त्यांनी अमरावती, नाशिक, धुळे, नांदेड, मुंबई रेल्वे, आणि औरंगाबाद विभागात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

 

2003 मध्ये नाशिक कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सन्मानित. 2013 मध्ये नागपूर येथे कार्यरत असताना उत्कृष्ट सेवा पदक मिळाले. 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून विशेष सेवा पदकाने सन्मानित. 2020: मध्ये अंतरिक सुरक्षा सेवा पदक प्राप्त. 2022 मध्ये PETA इंडिया मानवी पुरस्कार मिळवला.

छंद आणि व्यक्तिमत्त्व

सिंगल हे फोटोग्राफी, पिस्तूल शूटिंग, मॅरेथॉन, सायकलिंग यांसारख्या छंदांत पारंगत आहेत. त्यांनी “आयर्न मॅन” किताबही मिळवला आहे. तसेच, “मालेगावची यात्रा”, “पोलिसिंग अ न्यू डायमेन्शन” यांसारख्या पुस्तकांचे लेखनही केले आहे. डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळणे हा नागपूरसाठी सन्मानाचा क्षण आहे. हा पुरस्कार त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि नागपूर पोलिसांच्या उत्कटतेचा प्रतीक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर पोलीस दलाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्कृष्टतेचा ध्यास घेतला आहे, जो निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!