महाराष्ट्र

Amol Mitkari : महाकुंभातील गंगाजल ते महाराष्ट्रातील राजकीय लाट

NCP Politics : रोहित पवारांच्या कृतीवर चर्चेचा महापूर

Post View : 20

Author

प्रयागराजमध्ये 144 वर्षांनंतर महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक नेते महाभूमी येथे गंगा स्नान करण्यासाठी जात आहेत. अशात रोहित पवार यांच्या कृतीने राज्यात राजकीय लाट उफाडली आहे.

भारतात सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्याचा विषय चांगलाच गाजत आहे. लाखो भक्तांनी या पवित्र संगमावर स्नान केले असले तरी काहींना आपला जीवही गमवावा लागला. जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या या मेळाव्याला दरवेळी काही ना काही वादाची किनार असते आणि यंदाही वेगळे चित्र नाही. पंतप्रधान मोदी की मुकेश अंबानी, प्रत्येक लोकांनी या संगमावर स्नान केले आहे. महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांनीही यात डुबकी मारली.

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप नेहमीच चालू असतात.  पण थेट प्रयागराजला जाऊन गंगाजल आणून वितरित करण्याची रोहित पवार यांची कृती थोडी अनोखीच आहे. काहींना हे धार्मिकतेचं प्रतीक वाटत असलं तरी विरोधक मात्र यावर ताशेरे ओढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावर बोचरी टीका केली आहे.

श्रद्धा की राजकीय स्टंट बाजी?

शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी महाकुंभात डुबकी मारत थेट गंगाजल आणण्याचा निर्णय घेतला. आणि फक्त आणलेच नाही तर ते महाराष्ट्रातील घराघरात वाटण्यासही सुरुवात केली. आता प्रश्न असा आहे की, हा त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे, की केवळ राजकीय स्टंटबाजी?

धरती पर उतरी थी लेकर कितना पावन पाणी? इसमे नहाये कामी, क्रोधी, लोभी, खल, अज्ञानी!” अशा शब्दांत मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे रोहित पवारांवर आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मिटकरी यांच्या या वक्तव्याचा रोहित पवार आणि त्यांचे समर्थकांनी तीव्र विरोध केला आहे. पण यातून एक प्रश्न निर्माण होतो पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात धार्मिकता खेळवली जात आहे का?

सत्तेसाठी धर्माचा वापर

गेल्या काही वर्षांत राजकारणात धर्माचा वापर वाढला आहे. अनेक पक्ष आपापल्या परीने धर्माचा वापर करताना दिसतात, मात्र राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षातील एका नेत्याने थेट गंगाजल वाटण्यास सुरुवात केल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे.

 

धर्म हा व्यक्तिगत श्रद्धेचा विषय आहे, पण जेव्हा तो राजकीय स्वार्थासाठी वापरला जातो, तेव्हा त्याचा गैरवापर सुरू होतो, असे मत अनेकांनी मांडले आहे. आता पाहायचं हे आहे की, रोहित पवार यांच्या या कृतीमुळे त्यांना जनतेचा पाठिंबा मिळतो, की यामुळे त्यांच्यावर टीका होत राहते? एक मात्र निश्चित महाराष्ट्राचं राजकारण आता गंगाजलाच्या लाटेवर स्वार झालं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!