महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : भारतरत्न, फुले आणि मोदींना पत्र

Women's Day : पुणे विद्यापीठ नामांतरानंतर माजी मंत्र्याचे पत्र

Post View : 37

Author

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, स्त्री शिक्षणाचे शिल्पकार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि माजी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. विशेष म्हणजे या मागणीला 100 हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळे या प्रस्तावाची दखल घेतली जाईल, अशी शक्यता आहे.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात लढा दिला. 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, हीच पुढे भारतातील स्त्री शिक्षणाच्या चळवळीची गंगा झाली. त्या काळातील सामाजिक बंधनांना झुगारून त्यांनी उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला.

Pravin Datke : नागपूर विकासासाठी बुलंद झाला दमदार आवाज

ऐतिहासिक प्रयत्न

स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या या दैदिप्यमान कार्याला सलाम करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यापूर्वीही त्यांनी ‘पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव मिळावे’ यासाठी मोठा संसदीय लढा दिला आणि तो यशस्वी ठरला. आज पुणे विद्यापीठ ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ या नावाने ओळखले जाते. त्यामागे मुनगंटीवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती.

पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या संघर्षामुळे लाखो स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडली गेली. त्यामुळे त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देणे हे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब ठरेल.’

Chhatrapati Shivaji Maharaj : सत्ताधाऱ्यांचे कथित खास कोरटकर अडचणीत

महत्त्वाची मागणी

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या मागणीला विशेष महत्त्व आहे. भारतातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळणे, हा केवळ एक सन्मान नसेल, तर स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल असेल. त्यांच्या संघर्षाने भारतीय स्त्रियांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला.

देशातील आजही अनेक भागांमध्ये मुलींच्या शिक्षणाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, महिला दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला भारतरत्नसारखा सर्वोच्च सन्मान मिळणे, हा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरेल. सुधीर मुनगंटीवार यांनी उचललेली ही पावले केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण देशभर स्त्री सशक्तीकरणाला चालना देणारी आहेत.

Beed : धनंजय मुंडेंच्या सोबतचा ‘हा’ तरुण कोण…

सादर प्रस्ताव केंद्र सरकार कितपत गांभीर्याने घेते आणि मोदी सरकार यासंदर्भात काय भूमिका घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न प्रदान केला गेला, तर तो संपूर्ण भारतीय समाजासाठी अभिमानास्पद क्षण ठरेल. महिला दिनाच्या निमित्ताने सरकारने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आशा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!