महाराष्ट्र

Uday Samant : मराठीच्या अभिजाततेला डिजिटल साज

Abhijaat Marathi : उदय सामंतांच्या पुढाकाराने मराठी ओटीटीला नवी ओळख

Author

अभिजात मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली आहे. मराठी भाषेला नवसंजीवनी मिळाली आहे. उदय सामंत यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली असून भाषेच्या जपणुकीसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे.

मुंबईत 1 मे 2025 रोजी पार पडलेल्या राजभाषा मराठी दिन विशेष कार्यक्रमात एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर, आता ती अभिमानाने डिजिटल विश्वात नांदावी यासाठी अभिजात मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली. या मंचाचा लोगो आणि शुभारंभ मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, विभागाचे सचिव आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

अभिजात मराठी हा प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनाचं साधन नसून तो एक संस्कृतीचा दीपस्तंभ ठरणार आहे. सुमन एंटरटेनमेंटने या उपक्रमाची संकल्पना साकारत AI आणि ग्लोबल कंटेंटच्या युगात मराठीला आत्मभानाचा नवा चेहरा दिला आहे.

Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही धूसर 

अस्मितेचा डिजिटल संकल्प

सध्याच्या काळात मराठी कलाकृतींना प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमी महत्त्व दिलं जातं. अभिजात मराठी या व्यासपीठाच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्यात येणार आहे. सुमारे 20 कोटी मराठी भाषिकांपर्यंत दर्जेदार मराठी आशय पोहोचवण्याचं ध्येय या प्लॅटफॉर्मने घेतलं आहे. ही एक डिजिटल चळवळ असून, मराठी निर्मात्यांना नवी संधी आणि प्रेक्षकांना अभिमानाने पाहण्यासारखा आशय यांचं व्यासपीठ ठरणार आहे.

मंत्री डॉ. उदय सामंत यांनी या कार्यक्रमात सांगितलं की, मोबाईलच्या माध्यमातून आज प्रत्येक जण दररोज काही ना काही डिजिटल पाहतो. जर अशा वेळी एक स्वतंत्र मराठी ओटीटी व्यासपीठ असेल, तर त्यातून भाषेचं जतन आणि प्रसार अधिक प्रभावीपणे होईल. अभिजात मराठी ही काळाची गरज आहे.

Political War : आपलं काहीच नाही, पण गजरा मात्र माळायचा 

दर्जेदार आशयाचा खजिना

अभिजात मराठी हे व्यासपीठ पूर्णतः मोफत असणार आहे. या प्लॅटफॉर्मवर दर्जेदार चित्रपट, वेबसीरिज, लघुपट यांचा समावेश असणार आहे. याशिवाय, इतर भारतीय भाषांतील निवडक चित्रपट मराठीत डब करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून भाषेची अडचण दूर करत अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत उत्कृष्ट कंटेंट पोहोचवण्याचं ध्येय घेतलं आहे.

जागतिक दर्जाच्या चित्रपटांसाठीही मराठी सबटायटल्स देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय आशयही मायबोलीत अनुभवता येणार आहे. यामुळे स्थानिकतेचा अभिमान आणि जागतिकतेची गुणवत्ता एकत्र नांदणार आहे.

Crime Control : नागपूर पोलिसांकडून गुन्हेगारीला कडक वज्राघात 

नवोदितांसाठी दालन उघडले

अभिजात मराठीचे संस्थापक केदार जोशी यांनी स्पष्ट केलं की, ही केवळ एक ओटीटी सेवा नसून ती आपल्या भाषेची, संस्कृतीची आणि अस्मितेची जागृती आहे. मराठी भाषेने जगावं, बहरावं, यासाठी हे व्यासपीठ उभारलं जात आहे.

अभिजात मराठीचा सॉफ्ट लॉन्च जुलै 2025 मध्ये 1 हजार निवडक प्रेक्षकांसाठी होणार आहे. ऑक्टोबरमध्ये मराठी भाषा आठवड्याच्या निमित्ताने त्याचा भव्य अधिकृत प्रारंभ होणार आहे. हे व्यासपीठ मराठी डिजिटल इंडस्ट्रीसाठी मैलाचा दगड ठरेल.

Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा कर्जमाफीची ट्रेन डीसीएम ते सीएम निवासापर्यंत 

अभिजात मराठी व्यासपीठावर प्रसारित होण्यासाठी सर्व प्रकारच्या दर्जेदार मराठी कलाकृतीचं स्वागत करण्यात येत आहे. चित्रपट, वेबसीरिज आणि लघुपट क्षेत्रातील नवोदित निर्मात्यांना एक स्वतंत्र, विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!