महाराष्ट्र

ACB Raid : गोंदिया, चंद्रपुरात एसीबीचा छापा; चौघांना पकडले

Action Against Bribe : नाशिकच्या पथकाला निरीक्षकाला फटका

Author

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पूर्व विदर्भात दोन ठिकाणी छापे घातले आहे. लाचेची मागणी करणाऱ्या चार जणांविरुद्ध छाप्यात कारवाई करण्यात आली आहे.

शुक्रवार, 11 एप्रिलला सूर्य पूर्व विदर्भातील चार अधिकाऱ्यांसाठी अडचण घेऊन उगवला. लाचेची मागणी करणाऱ्या चार अधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. नाशिक येथील पथकाने गोंदिया येथे येत कारवाई केली. यात आरटीओ कार्यालयातील परिवहन निरीक्षक योगेश खैरकर याला लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले आहे. दुसरी कारवाई चंद्रपूर जिल्ह्यात झाली आहे. या छाप्यात देखील दोन वरिष्ठ अधिकारी एसीबी पथकाच्या हाती लागले आहे.

चंद्रपूर येथील जिवती तालुक्यातील एकाला जिल्हा परीषद येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष यशोराम बोहरे आणि वरीष्ठ सहायक सुशील मारोती गुंडावार, कंत्राटी परिचर मो. मतीन फारूख शेख यांनी पैशांची मागणी केली होती. तक्रारदार कंत्राटदार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत तालुका जिवती आणि राजुरा येथील एकूण 24 गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी 10 गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे होते. एकूण 43 लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. मात्र उर्वरित रक्कम अडली.

Improvements: विदर्भात मध्य रेल्वेने घेतली विकासाची आघाडी

चार लाखावर मागणी

बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता हर्ष यशोराम बोहरे यांनी पैशांची मागणी केली. चार लाखात सौदा ठरला. बोहरे यांनी रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सागितले. गुंडावार यांनी स्वतःचे 20 हजार रुपये त्यात घ्यायला लावले. त्यामुळे रक्कम 4 लाख 20 हजार झाली. कंत्राटदाराने तक्रार दिल्यावर एसीबीने सापळा रचला. गुंडेवार यांनी रक्कम स्वीकारत परिचर मतीन शेख यांना उर्वरील चार लाख बोहरे यांचे घरी नेण्यास सांगितले. पोलिसांनी यानंतर तिन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात यश मिळवले. याप्रकरणी शुक्रवार, 11 एप्रिल रोजी चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. नागपूर एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे, उप अधीक्षक मंजुषा भोसले यांनी ही कारवाई केली. चंद्रपूर एसीबीचे जितेंद्र गुरनूले, हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, पुष्पा काचोळे, सतिश सिडाम, संदीप कौरासे यांनी कारवाईत कामगिरी बजावली.

गोंदिया जिल्ह्यात नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा घातला. या कारवाईत गोंदिया आरटीओ कार्यालयातील परिवहन निरीक्षक खैरनाग हे पकडल्या गेल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले. शुक्रवार, 11 एप्रिल रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली. सकाळी 11.48 वाजेपर्यंत नाशिक एसीबी पथकाकडून कारवाई सुरू होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. परिवहन निरीक्षकाविरुद्ध नेमकी काय, तक्रार होती याचा तपशील कारवाई सुरू असल्यामुळे मिळू शकला नाही. काही तासांच्या अंतराने पूर्व विदर्भात पडलेल्या या दोन छाप्यांमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वाळू माफियांसोबत संबंध असल्याचा ठपका ठेवत गुरुवार, 10 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील दोन महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात एक उपजिल्हाधिकारी आणि एक तहसीलदार आहे. सलग दोन दिवसातील कारवाईमुळे पूर्व विदर्भातील प्रशासकीय यंत्रणा चर्चेत आली आहे.

Vijay Wadettiwar : दाऊदला आणले असते, तर मानले असते

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!