महाराष्ट्र

Bhandara Sand Mafiya : दोषींनो सामानाची पॅकिंग सुरू करा

Chief Minister : वाळू माफियांसोबत साटेलोटे असणाऱ्यांना बसणार फटका

Post View : 47

Author

भंडाऱ्यातील वाळू माफियांविरोधात आता सरकारनं लगाम कसली आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तक्रार केल्यानंतर वेगानं सूत्र हलत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ शब्दाला प्रचंड वजन असलेले माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी वाळू माफियांविरोधात दंड थोपटले आहे. तुमसर तालुक्यातील या प्रकाराची त्यांनी फडणवीस यांच्याकडं तक्रार केली आहे. त्यानंतर वाळू माफियांशी साटेलोटे असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आता कारवाई होणार आहे. 8 एप्रिल रोजी यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे. अवघ्या काही तासात त्याचे परिणाम दिसतील असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं वाळू माफियांशी साटेलोटे असणाऱ्या अधिकाऱ्यांना आता सामानाचं पॅकिंग करावं लागणार आहे.

एखाद्या विषयात आमदार डॉ. परिणय फुके यांनी हात घातला आणि त्याचा छडा लागला नाही, असं होऊच शकत नाही. वाळू तस्करीच्या बाबतही तसंच झालं आहे. डॉ. फुके यांनी तस्कर आणि त्यांच्याशी हातमिळवणी केलल्या अधिकाऱ्यांबाबत अनेक पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची तातडीनं दखल घेतली. डॉ. फुके यांच्या पत्रावर शेरा देत महसूल मंत्र्यांना कारवाईचे आदेश दिलेत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री स्वत: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलले. त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात झाली.

Parinay Fuke : तस्कर, अधिकाऱ्यांवर येत्या काही तासात कारवाई; सीएमचे आदेश

कोणत्याही क्षणी आदेश

वाळू माफियांशी हातमिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आता कारवाईचे आदेश निघणार आहेत. महसूल विभागानं यासंदर्भात चौकशी केली होती. त्याच्या आधारावर कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील महसूल प्रशासनात संबंधित अधिकारी कोण‌, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. या अधिकाऱ्यांनाही आपल्यावर कारवाई होणार असल्याचं आता कळलं आहे. त्यामुळं त्यांना आता चांगलीच धडकी भरली आहे. आपलं आता काही खरं नाही, हे कळल्यामुळं या अधिकाऱ्यांनी पॅकिंग सुरू केली आहे. माफियांशी हातमिळवणी करण्याची शिक्षा त्यांना मिळाल्यानंतर मोठी विभागीय चौकशी देखील होण्याचे संकेत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सुरू असलेली बाळू तस्करी गंभीर समस्या झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांनी देखील सरकारकडं तक्रार केली होती. मात्र कारेमोरे यांच्या तक्रारीला त्यावेळी वजन आलं ज्यावेळी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडं तक्रार केली. डॉ. फुके यांनी तक्रार करताच मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. फडणवीस स्वत: महसूल मंत्र्यांशी बोलले. त्यामुळं वाळू तस्कर आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांचं काही खरं नाही, असं मानलं जात होतं. कारवाईला सुरुवात झाल्यानं आता पुन्हा एकदा हेच सिद्ध झालं आहे की भंडाऱ्यात ‘जो कायदे में रहेगा वो फायदे में रहेगा.’

Parinay Fuke : गोड्या पाण्यात रोजगाराचा हक्क अबाधित राहणार

 

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!