महाराष्ट्र

Aditi Tatkare : लाडक्या बहिणींना महिला दिनी गिफ्ट

Ladki Bahin : एकाच वेळी मिळणार दोन महिन्यांची रक्कम

Post View : 28

Author

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्याची मोठी घोषणा केली आहे, त्यामुळे लाखो महिलांना 8 मार्च रोजी तीन हजार रुपये मिळणार आहेत.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ परिसरात मोठी घोषणा केली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना 8 मार्च रोजी एकाच वेळी तीन हजार रुपये मिळणार आहेत.

महिलांसाठी महिला दिनाच्या मुहूर्तावर हा निर्णय घेतला गेला असून, यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता सरकारने त्यावर तोडगा काढत दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nagpur : रेल्वे महसूल वाढवणारे नागपूरचे टिकटगुरू

महिला दिनानिमित्त भेट 

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात विधानसभेबाहेर महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, सरकार महिलांच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून लाडकी बहीण योजनेचा विस्तार आणि प्रभाव वाढवला जात आहे. महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एक दिवस आधी, म्हणजेच 7 मार्च रोजी मोठी घोषणा करतील. 5 ते 7 मार्च दरम्यान संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि 8 मार्चला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील,असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

आर्थिक सशक्तीकरणाचा सोहळा

राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मागील महिन्यात 2 कोटी 35 लाख महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळाली होती. या महिन्यात ही संख्या वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. महायुती सरकार सक्षम आहे आणि आम्ही लाडकी बहीण योजनेला अधिक प्रभावी बनवणार आहोत. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, याची आम्ही खात्री देत असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

हप्ता रखडल्याने नाराजी

फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नव्हता, त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रमाची आणि नाराजीची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता मार्च महिन्याचा हप्ता एकत्र दिल्याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिला दिनाच्या मुहूर्तावर हा आर्थिक मदतीचा मोठा निर्णय घेऊन सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांना नवी दिशा दिली आहे. हा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वायत्ततेला चालना देणारा ठरणार आहे.

महिला सशक्तीकरणासाठी पुढाकार

महिला सशक्तीकरण हा महाराष्ट्र सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांद्वारे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. योजना फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नाही, तर महिलांना रोजगार, शिक्षण आणि उद्योजकतेसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार नवीन योजना आणणार आहे, असेही तटकरे यांनी सूचित केले.

सरकारकडून निर्णय 

राज्यातील लाखो महिलांसाठी 8 मार्च हा दिवस आनंदाचा ठरणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानासाठी घेतलेला हा निर्णय राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक धोरणात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आदिती तटकरे यांच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा आधार मिळणार असून, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत वेळेवर मिळावी, यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत. महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे जाणार आहे, यात शंका नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!