महाराष्ट्र

Gadchiroli : शिंदे गटाची बैठक झाली, बैठक होताच हाणामारी झाली

Dada Bhuse : दादा भुसेंची पाठ फिरताच जिल्हाप्रमुख भिडले

Share:

Author

शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद गडचिरोलीत चिघळला आणि थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. जिल्हाप्रमुखांच्या या हातघाईमुळे पक्षाच्या शिस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यानंतर शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुखांमध्ये झालेली थेट मारामारी ही केवळ राजकीय बेबनाव नव्हे, तर निवडणूकांच्या तोंडावर पक्षातील सुसंवादाच्या कमतरतेचं ठळक उदाहरण बनली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वात गटशक्तीपेक्षा वैयक्तिक श्रेयवाद महत्त्वाचा ठरतोय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या दौऱ्यात, गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरी जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यात मोठा वाद झाला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते चंद्रपूरकडे रवाना झाले. त्यांचं वाहन निघताच, दोन्ही जिल्हाप्रमुख एकमेकांवर तुटून पडले. वाद इतका विकोपाला गेला की, शब्दांच्या बाचाबाचीचं रूपांतर थेट धक्काबुक्की आणि हाणामारीत झालं.

Devendra Fadnavis : ईमारती नव्हे, भविष्य घडवतोय शिक्षणाचा विठ्ठल

श्रेया घेण्यासाठी स्पर्धा

या धक्कादायक प्रकारामुळे सर्किट हाऊस काही काळासाठी ‘राजकीय अखाडा’ वाटू लागला. उपस्थित पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी दोघांनाही वेगळं केलं, नाहीतर हा वाद आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकला असता. हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला हे जरी स्पष्टपणे समोर आलं नसलं, तरी स्थानिक पातळीवरील ‘श्रेयानं वरचढ’ होण्याच्या स्पर्धेतूनच ही भिडंत झाली असल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शिंदे गटातील गटबाजीचे वारे पुन्हा जोरात वाहू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, पक्षांतर्गत अशा प्रकारचा संघर्ष हा थेट गटप्रमुखांच्या नेतृत्व क्षमतेवर आणि शिस्तीवरच प्रश्न उपस्थित करतो. पक्षाच्या एकात्मतेवर आणि स्थानिक जनतेच्या विश्वासावर या वादामुळे मोठा आघात झाल्याचं मानलं जातं आहे.

Bhandara : शाळा बंद, भविष्य अंधारात अन् शिक्षण मंत्री मौनात

ग्रामस्थांची समजूत

दुसरीकडे, याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक हृदयद्रावक घटना घडली. गडचिरोली-नागपूर मार्गावरील काटली गावात सकाळच्या वेळी भरधाव ट्रकने व्यायाम करणाऱ्या सहा मुलांना चिरडलं. या भीषण अपघातात चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-गडचिरोली मार्गावर रास्ता रोको केला. याचवेळी दादा भुसे यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

मंत्र्यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांशी संवाद साधत तात्काळ कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेत्यांकडून झालेल्या गोंधळामुळे संतापाचा सूर अधिक तीव्र झाला आहे.

Parinay Fuke : देवाभाऊंनी आमदारांना दिली मुख्यमंत्री पदाची उपमा

प्रश्नचिन्ह उपस्थित

या दोन्ही घटनांनी गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे. एकीकडे निष्पाप बालकांचा मृत्यू. दुसरीकडे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधील हाणामारी, या विरोधाभासपूर्ण घटनांमुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेतृत्वाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, शिंदे गटाने जर तातडीने शिस्तबद्ध कारवाई केली नाही, तर या प्रकाराचा फटका पक्षाला आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये बसू शकतो. कारण, जनता विकासासाठी आणि स्थैर्यासाठी मतदान करते, गटबाजीसाठी नव्हे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!