महाराष्ट्र

Prashant Padole : भंडाऱ्यात नव्या पुलावर पाण्याचा पूर

Bhandara : ढिसाळ कामगिरीवर प्रशांत पडोळेंचा रोष

Share:

Author

भंडाऱ्यात झालेल्या अवकाळी पावसाने नव्या पुलावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ही परिस्थिती पाहून खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रस्त्याच्या कामावर नाराजी व्यक्त केली.

भंडारा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण परिसराला भिजवले. मात्र या पावसाच्या सरींनी केवळ मातीच नव्हे तर प्रशासनाच्या ढिसाळ कामाचीही परखड पोलखोल केली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील भंडारा ते साकोली रस्त्यावरील भिलेवाडा गावाजवळ नव्याने बांधलेल्या पुलावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. काम पूर्ण झाल्यानंतरही अशी परिस्थिती उद्भवल्याने भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रस्त्याच्या कामावर ताशेरे ओढले.

खासदार पडोळे स्वतः पाण्यातून चालत जाऊन रस्त्याची अवस्था प्रत्यक्ष पाहिली. पुलावर साचलेल्या पाण्यातून चालताना त्यांनी नागरिकांच्या वेदनांचा अनुभव घेतला. अवघ्या काही तासांच्या पावसाने जर पुलावर एवढे पाणी साचले, तर पुढे मुसळधार पावसात काय परिस्थिती होईल, याचा विचारच अंगावर शहारे आणणारा ठरतो.

Harshwardhan sapkal: महाराष्ट्रात पोलिस यंत्रणा फेल

निकृष्ट कामाचा आरोप

अवकाळी पावसात भिलेवाडा गावाजवळील पुलावर प्रचंड प्रमाणात पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पुलावरील कामात गंभीर त्रुटी असल्याचे यावरून स्पष्ट दिसते. या निकृष्ट दर्जाच्या कामावर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी संताप व्यक्त करत ठेकेदारांवर आणि प्रशासकीय दुर्लक्षावर सडकून टीका केली.

डॉ. पडोळे यांनी यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन रस्त्याच्या दर्जाबाबत लक्ष वेधले होते. मात्र त्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याचे आणि प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे ते स्पष्टपणे सांगतात. पुलावर साचलेले पाणी हा अपघातांना आमंत्रण देणारा गंभीर प्रकार आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Bhandara : वाळू माफियांचा प्रशासनावर हल्ला

लोकहितासाठी संघर्षाची भूमिका

पावसाच्या एका फेरीनेच रस्त्याच्या निकृष्टपणाचे दर्शन घडवले आहे. नागरिकांचे जीव धोक्यात घालणारे असे अपूर्ण आणि निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या मूलभूत सुविधांच्या हक्कासाठी लवकरच मोठ्या जनआंदोलनाची दिशा दाखवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांबाबत त्यांनी प्रशासनाला सजग राहण्याची गरज असल्याचेही सांगितले. नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. हा मुद्दा डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. ते आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत, असा ठाम आरोप त्यांनी केला.

Nagpur : उपराजधानीच्या बोगस शिक्षण विभाग घोटाळ्यात ईडीचे तास सुरू  

सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना जबाबदार धरत डॉ. पडोळे यांनी यावेळी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर थेट प्रहार केला. अपूर्ण आणि अनास्थेने केलेल्या कामांमुळे जनतेचे नुकसान होत असेल, तर त्याचा तीव्र निषेध केला जाईल. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, असे त्यांनी ठामपणे जाहीर केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!