महाराष्ट्र

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बोलून दिलं अन् डिलीटही केलं

Maharashtra : अजित पवारांची भावना उफाळून आली, पण मग घेतला यू-टर्न 

Post View : 37

Author

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील कार्यक्रमात “मुख्यमंत्री बनायचं आहे”, असं म्हणत मनातील भावना बोलून दाखवताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, लगेचच ते विधान ‘गंमतीत केलं होतं’ असं सांगत त्यांनी माघार घेतली आणि चर्चांना पूर्णविराम दिला.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद उघड केली. ‘मलाही मुख्यमंत्री बनायचं आहे, पण योग जुळून येत नाही,’ असं म्हणत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या आशांना शब्द दिला. मात्र, त्यांच्या या विधानानंतर निर्माण झालेल्या राजकीय खळबळीनंतर अजित पवारांनी तितक्याच शांतपणे ‘गंमतीत म्हटले होते’ असं सांगत आपल्या विधानावरून माघार घेतली.

अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री पदाबाबत’ केलेल्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा जोरात रंगल्या. अनेक राजकीय विश्लेषकांनी या वक्तव्याचे अर्थ लावण्यास सुरुवात केली. काहींनी हे विधान आगामी निवडणुकांसाठी दबाव तंत्र मानले, तर काहींनी त्याला त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेचे स्पष्ट संकेत मानले. या वक्तव्यानंतर माध्यमांनी पवार यांना प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर देताना स्पष्टीकरण दिलं. “मी गंमतीत म्हटले होते. मी असं म्हटलं असेल तर माझे शब्द मागे घेतो. त्यामुळे आता हा विषय इथेच संपवूया,” असं म्हणत त्यांनी पुढचा वाद टाळण्याचा प्रयत्न केला. ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री होण्यासाठी केवळ इच्छा असून भागत नाही, तर 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. सध्या तो पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ आहे. याआधी तो एकनाथ शिंदेंकडे होता, आणि त्याआधी उद्धव ठाकरे यांच्याकडे.

Corporation Election : कोल्ड वॉरचा कल महापालिका निवडणुकीत दिसणार

इच्छेवरून पलटी

आजवर अनेक वेळा अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी किमान पाच वेळा जाहीरपणे या इच्छेचा उल्लेख केला आहे. कार्यकर्त्यांमध्येही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची तीव्र इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनीही वेळोवेळी हाच सूर लावला आहे की, “अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत.” त्यामुळे अजित पवारांच्या मनात मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अजूनही धगधगतंय, हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरळी येथे 1 ते 4 मे दरम्यान ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने भरवलेल्या या महोत्सवात 2 मे रोजी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, मीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगतो, पण वेळ आणि परिस्थिती जुळून यायला हवी.

Pankaj Bhoyar : शालार्थ घोटाळ्यात एसआयटी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

अजित पवार हे आजवर सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रीपद भूषवले, त्यानंतर महायुती सरकारमध्ये देखील त्यांना हेच पद मिळालं. त्यामुळे राज्याच्या सत्तेत ते कायम केंद्रस्थानी राहिले आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही. सध्याची सत्ता आणि आमदार संख्येचा विचार करता अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी अजूनही मोठं राजकीय गणित जुळवावं लागेल. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटणाऱ्या भावना आणि त्यांच्या स्वतःच्या इच्छेपुढे अद्याप संधीचं दार उघडलेलं नाही.

जरी अजित पवारांनी ‘मी असं म्हटलं असेल तर माझे शब्द मागे घेतो,’ असं सांगितलं असलं, तरी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा स्पष्टपणे जाणवते. शब्द मागे घेता येतील, पण इच्छा? ती अजूनही त्यांच्या व त्यांच्या समर्थकांच्या मनात जिवंत आहे, आणि याच इच्छेवर पुढील राजकीय समीकरणं ठरणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!