महाराष्ट्र

Amol Mitkari : खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांची स्पर्धा सुरू

Political Drama : धीरूभाईंनी पेट्रोल ‘सोडलं’ की ‘चोरलं’?

Post View : 30

Author

नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांनी धीरूभाई अंबानी यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पेटली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या ठाम आणि बेधडक शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या भाषणात कधी कधी राजकीय वादळ निर्माण होतात, हे आता काही नवीन राहिलेलं नाही. पण यंदा माळेगावमधील एका निवडणूक प्रचार सभेत केलेलं एक साधंसं उदाहरण त्यांच्यावरच उलटून येईल, याची कदाचित त्यांनाही कल्पना नसेल. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात अजित पवार यांनी तरुणांना प्रेरणा देण्यासाठी एक उदाहरण दिलं. ‘धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करून पुढे जाऊन कोट्यधीश बनले,’ असं त्यांनी सांगितलं.

त्यामागचं मूळ उद्दिष्ट होता कोणतंही काम कमी नाही, मेहनतीतून यश मिळवता येतं. मात्र इथेच ‘सोडून’ या शब्दाचा सोशल मीडियावर चुकीचा अर्थ लावण्यात आला. ‘सोडून’ ऐवजी ‘चोरून’ असा अर्थ लावला गेला आणि वादाला तोंड फुटले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ‘सोडून’ ऐवजी ‘चोरून’ असा अर्थ घेत दादांना ट्रोल करण्याचा सपाटा लावण्यात आला. काहींनी तर थेट या वक्तव्याला भ्रष्टाचाराशी जोडण्याचा प्रयत्न केला. समाजसेविका अंजली दमानिया यांनी तर या मुद्द्यावरून थेट टीका करत ट्विटरवर पोस्ट केली, आणि तिथून हा विषय अधिकच तापला.

Caste Census : 2027 मध्ये जनगणनेचा डिजिटल राग सजणार

मेहनतीची तरुणांना शिकवण

यावर स्वतः अजित पवार यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. ‘मी जर खरोखर ‘चोरून’ असा शब्द वापरला असेल, तर मी राजकारण सोडेन, असं ते स्पष्ट म्हणाले. त्यांनी मीडिया आणि ट्रोलर्सवर थेट आरोप केला की, ‘ध’ चा ‘म’ करून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खोट्या बातम्या पसरवण्यात काही तथाकथित समाजसेवक, झोलाझुलं पत्रकार, आणि भलतेच तत्वज्ञानी पुढे आहेत.

स्वतःच्या करिअरमध्ये विश्वासार्हता नसलेल्या लोकांना दुसऱ्याचं विकृत अर्थ काढून प्रसिद्ध व्हायचं आहे, असा घणाघात त्यांनी केला. मिटकरी म्हणाले की, अजितदादांचं वक्तव्य हे प्रेरणादायी होतं. त्यांच्या बोलण्यातून तरुणांना मेहनतीचं महत्त्व समजावं, ही त्यामागची भावना होती. पण काही मंडळींनी त्याचा राजकीय अपप्रचारासाठी गैरवापर केला. अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलं की, कोणतंही काम लहान नाही. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या धीरूभाईंनीही मोठं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणलं. याच विधानामधून त्यांनी सहकार क्षेत्रालाही प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की, मी पेट्रोल पंप उभारण्याचा विचार केला होता, पण सहकार टिकवणं हे माझं प्राथमिक उद्दिष्ट होतं.

Eknath Shinde : उपोषणाचं रण थांबलं शिंदेंच्या बोलण्यानं 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!