महाराष्ट्र

निवडणुकीत विरोधात काम भोवले; Akot BJP मधून 11 जणांची हकालपट्टी 

विधानसभा Election काळात पक्षाच्या विरोधात कारवाया

Share:

Author

विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अकोला जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात यश आले. मात्र पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्यांविरुद्ध आता भाजपने कारवाई सुरू केली आहे. 

विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवार विरोधात काम करणाऱ्यांचे निलंबन भाजपने सुरू केले आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी 11 जणांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. यासाठीची शिफारस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे. या सर्वांनी अकोट विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या विरोधात काम केले. या संदर्भातील पुरावे मिळाल्यानंतर जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी या सर्वांना पक्षातून सहा वर्षांसाठी काढण्याची कारवाई प्रस्तावित केली आहे.

भारतीय जनता पक्षातून सहा वर्षासाठी अकोट विधानसभा मतदारसंघातील 11 पदाधिकाऱ्यांना हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी त्यांच्याकडे आलेल्या लेखी तक्रारी अनुसार ही कारवाई केली आहे. कारवाई करण्यापूर्वी सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पक्षातून काढलेल्या मध्ये अकोटचे माजी नगरसेवक मंगेश चिखले, पंचायत समिती सदस्य राजेश येऊल, विशाल गणगणे यांचा समावेश आहे. याशिवाय प्रा. राजेंद्र फुंडकर, सुनील गिरी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकड, अरविंद लांडे, राजेश पाचडे, विष्णू बोडखे, निलेश तिवारी, चंचल पितांबरवाले यांनाही पक्षातून काढण्यात आले आहे.

आणखी Action होणार 

विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. अलीकडेच अकोला शहरात भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले. या संदर्भात भाजपच्या अकोला कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुण्याच्या जोरावर अकोल्यात भाजपने निवडणूक लढवली. त्याच लालाजींच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही, अशी खुली टीका या बैठकीत करण्यात आली.

या सगळ्यांना पक्षातून काढून टाकण्यात येणार आहे. लवकरच महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तींचे तिकीट कापले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. अकोला भाजप मधील माजी नगरसेवक, माजी महापौराचे पती आणि काही कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पक्षातून काढण्यात आले आहे. त्यानंतर कारवाईचा हा क्रम सुरू आहे. ज्या 11 जणांना पक्षातून काढण्यात आले, त्यातील काही पदाधिकारी प्रदेश पातळीवर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना प्रदेश पातळीवरून देखील काढण्यात यावे, अशी शिफारस भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून अकोला भाजपमध्ये गटबाजीने जोर पकडला आहे. त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी प्रदेश भाजपने शहानिशा करून घ्यावी, अशी मागणी आता होत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये देखील नवनीत राणा यांच्या विरोधात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी काम केले. त्याचे कारण म्हणजे राणा कोणालाच नको होते. असेच काही नकोसे नेते भाजप अकोल्यातील कार्यकर्त्यांवर लागत असेल तर पक्ष नेतृत्वाला त्यात बदल करणेही गरजेचे आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!