महाराष्ट्र

Shiv Sena : युतीचा धर्मही जपणार, पण स्वबळाची धारही ठेवणार

Corporation Election : अकोल्यात शिवसेना शिंदे गट ठोकणार दम

Share:

Author

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला चालना मिळाली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने अकोल्यात निवडणूक लढण्याची तयारी करत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ही निवडणूक रखडली होती. आता या अडचणींना मागे टाकून निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार आहे. परिणामी सर्वच राजकीय पक्षांत चुरशीचे वातावरण तापले आहे. महायुतीपासून महाविकास आघाडीपर्यंत सर्वच पक्षांनी युद्धसज्जतेची तयारी सुरू केली आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीकडून निवडणूक एकत्र लढण्याची शक्यता जाहीर करून एक नवा राजकीय रंग भरला आहे.

महायुतीतील अनेक नेते अद्याप स्वबळाची चाचपणी करत आहेत. त्यामुळे राजकीय गणिते आणि संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना उधाण आले आहे. अकोल्यात मात्र शिवसेनेची या निवडणुकीसाठी विशेष तयारीत आहे. अकोला जिल्ह्यात शिवसेनेची निवडणूक तयारी अधिक ठोस बनली आहे. 8 मे 2025 रोजी शासकीय विश्रामगृह, अकोला येथे जिल्हा पातळीवर शिवसेनेची बैठक पार पडली. यावेळी अनेक निर्णयही घेण्यात आले आहे. ‘शिव संपर्क अभियान’, ‘सदस्य नोंदणी अभियान’ चालविण्यात येणार आहे. ‘संजय गांधी निराधार योजना’ अंतर्गत नोंदणी नसलेल्या लाभार्थ्यांची माहिती शिवसेनेकडे पोहोचली आहे.

Parinay Fuke : हक्काच्या प्रत्येक थेंबासाठी झुंज

कार्यकर्त्यांशी थेट संवाद

अकोला जिल्ह्यात गेल्या तीन-चार महिन्यांपासून या योजनेतील 20 ते 30 हजार लोकांची नावे अद्याप रजिस्टरमध्ये नाहीत आणि त्यांचे पैसेही थकलेले आहेत. अशा नागरिकांची यादी शिवसेनेकडे असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शिवसेना आता महानगरपालिकेची निवडणूक युतीशी आणि स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीत शिवसेना स्वबळाची तयारी ठेवणार आहे. प्रत्येक नगरपरिषद, जिल्हा परिषदेमध्ये आपला प्रतिनिधी उभा करण्याच्या उद्देशाने पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर देत, शिवसेना माहितीच्या आधारे रणनीती आखत आहे.

अकोला जिल्ह्यातील राजकारणाचा आलेख पाहता शिवसेनेने युतीत राहूनही स्वबळाची तयारी ठेवली आहे. वरून आदेश आला तर महायुतीचा धर्म पाळणार पण स्वबळाची वाट सुद्धा मोकळी ठेवणार अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. या दोन आघाड्यांवरच्या लढाईसाठी शिवसेनेचा अंतर्गत संवाद आणि कार्यकर्त्यांशी संपर्क अधिक बळकट केला जात आहे. या बैठकीला जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी संबोधित केले. शहरप्रमुख रमेश गायकवाड यांनीही सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, उपशहरप्रमुख भूषण इंदोरिया यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Operation Sindoor : पाकमध्ये ‘मातम’; काही मिनिटांत जम्मूत वीज सुरू

निवडणुकीसाठी रणनीती आखली जात असून कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की ही निवडणूक केवळ राजकीय नाही, तर पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे. राज्यात शिवसेनेच्या स्वबळावरील निवडणूक लढाईमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात मतदार आणि राजकीय नेत्यांच्या भूमिकांवर हे सगळे चित्र अवलंबून असेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!