महाराष्ट्र

Akola : मतदारसंघाच्या विकासात भारसाखळे यांचा ‘प्रकाश’

Constituency Development : कामगिरीच्या शर्यतीत अकोल्याच्या आमदारांनी मारली बाजी

Post View : 70

Author

अकोला जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा ताज्या अहवालातून लेखाजोखा समोर आला आहे. कोणत्या आमदाराने किती विकास केला हे स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आपापल्या खुर्च्या बळकट केल्या आहेत. मात्र मतदारांना केवळ आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष कामांची अपेक्षा असते. सत्तेवर आल्यानंतर आमदारांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी किती प्रयत्न केले, त्यांनी शासनाकडून मिळालेला निधी कसा आणि कुठे वापरला, यावर त्यांच्या कामगिरीचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन होतं. अकोला जिल्ह्यातील आठ आमदारांनी सहा विधानसभा सदस्य आणि दोन विधान परिषदेचे सदस्य आपापल्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा नुकताच पुढे आला आहे. या कामगिरीच्या यादीत भाजप आमदार प्रकाश भारसाकळे हे आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे.

भारसाखळे यांनी मिळालेल्या निधीचा जवळपास 85.32 टक्के वापर करत उदाहरण घालून दिलं आहे. प्रकाश भारसाकळे यांना राज्य शासनाकडून एकूण 654.58 कोटी इतका निधी मिळाला होता. विशेष बाब म्हणजे त्यांनी त्यातील 558.51 कोटी इतका निधी खर्च करून तब्बल 85.32 टक्के काम पूर्ण केलं आहे. हे प्रमाण अकोला जिल्ह्यातील सर्व आमदारांमध्ये सर्वोच्च आहे.

Ravindra Chavan : शब्द राणेंचे, भाजप नाही सहमत

जिंदगी एक बाद भी..

अकोला पश्चिमचे दिवंगत भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या विकास निधीतून 99.99 टक्के रक्कम वापरली गेली आहे. ही रक्कम 152.23 कोटी आहे. अकोला पूर्वेचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांना 611.28 कोटी रुपये इतका निधी मिळाला होताm त्यातील 483.65 कोटी खर्च करून त्यांनी आपलं योगदान दिलं. त्यांच्या कामाचा टक्का 79.12 टक्के एवढा आहे. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचं हे आमदारकीतलं पहिलं वर्ष आहे. त्यांच्या हातात 180 कोटी निधी आला होता. त्यातील सात टक्के निधी सध्या खर्च झाला आहे.

निधी वापराचे प्रमाण

पठाण यांनी केवळ 13 कोटी खर्च केला आहे. ज्यामुळे त्यांच्या कामाचा टक्का फक्त 7.22 टक्के इतका आहे. मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी 500 कोटींचा निधी मिळवला. त्यातून 262.22 कोटी खर्च झाले. ज्यामुळे त्यांच्या कामाचा टक्का 52.44 आहे. मूर्तिजापूर मतदारसंघात आमदार हरीश पिंपळे सर्वांत लोकप्रिय आहेत. सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळली आहे. आमदार पिंपळे यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात मोठे स्थानही मिळविले आहे.

Devendra Fadnavis : लाडकी बहीण ते लखपती दीदीचा संकल्प 

बाळापूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना 553.87 कोटी निधी प्राप्त झाला होता. ज्यापैकी त्यांनी 391.61 कोटी खर्च करून 73.35 टक्के कामं पूर्ण केली आहेत. विधान परिषद सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना मिळालेल्या 500 कोटी निधीचा संपूर्ण वापर केला आहे. म्हणजेच 100 टक्के कामगिरी. भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी 500 कोटींपैकी 427.13 कोटी इतका निधी खर्च केला आहे, जे कामाच्या 85.42 टक्के इतकं होतं. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांना 500 कोटी इतका निधी मिळाला होता.

खासदार धोत्रे यांनी 240.71 कोटी खर्च करून 48.14 टक्के विकास काम पूर्ण केली आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण निधी 300 कोटी इतका होता. ज्यामधून 2,7,077.51 इतका निधी खर्च झाला आहे. अन्य योजनांची आकडेवारीही दिलासा देणारी आहे. एससीपीसाठी 8800 कोटी निधी आला होता. ज्यातील 8798.96 कोटी खर्च करण्यात आले.

Nagpur Riots : पोलिसांनी झाड कापणाऱ्याला ठरवलं दंगेखोर

ओटीएसपी योजनेसाठी आलेला 1 हजार 545.28 कोटी निधी संपूर्ण खर्च करण्यात आला आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होतं की, काही आमदारांनी निधीचा प्रभावी वापर करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी मात्र संधी असूनही निधी वापरण्यात कुचराई केली आहे. प्रकाश भारसाकळे यांची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांनी इतर सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अकोल्यातील जनतेला आता विकासाचे ठोस परिणाम अनुभवायला मिळतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!