प्रशासन

Akot : माओवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पोलिसांचा मास्टर प्लॅन

Police Team : बीएसएनएल कार्यालयात अचानक दहशत

Author

अकोट शहरातील बीएसएनएल कार्यालयाभोवती पोलिसांचा मोठा फौजफाटा, सतर्क सुरक्षा यंत्रणा, आणि अफवा पसरली की दहशतवाद्यांनी हल्ला चढवला.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात चार एप्रिल रोजी एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांची हालचाल सुरू झाली. अनेकांना वाटले की, शहरात काही गंभीर घटना घडली आहे. पण प्रत्यक्षात हे एक नियोजनबद्ध मॉक ड्रिल होते. सरावाद्वारे पोलिसांनी आपली दहशतवादविरोधी सज्जता सिद्ध केली आणि नागरिकांना प्रत्यक्ष कृतीद्वारे सुरक्षाविषयी जागरूक केले. हा सर्व प्रकार नागरिकांसाठीही हा एक वेगळा अनुभव ठरला.

शहरात अफवा पसरली की, दहशतवाद्यांनी बीएसएनएल कार्यालयात घुसखोरी केली असून, त्यांनी दोन नागरिकांना ओलीस धरले आहे. यानंतर अकोट पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देत बॉम्ब शोधक पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसर त्वरित रिकामा करण्यात आला आणि पोलिसांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. काही वेळातच प्रशिक्षित पथकांनी आतंकवाद्यांन निष्प्रभ करत परिस्थिती नियंत्रणात आणली. संपूर्ण कारवाईत पोलिसांची झपाट्याने हालचाल, वायरलेस संदेशांची देवाण-घेवाण आणि बचाव कार्य पाहून नागरिक अवाक झाले.

Gondia : रेल्वे विकासाला नवे पंख 

नागरिकांची सुरक्षा

अनेकांनी ही परिस्थिती खरोखरची असल्याचा समज करून घेतला आणि त्यांच्या श्वासांना वेग आला. मात्र, काही वेळाने हे फक्त एक सराव असल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सरावामध्ये पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस उपअधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल आणि पोलिस निरीक्षक अमोल माळवे यांच्यासह विशेष पथकांनी सहभाग घेतला. या दरम्यान दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, आरसीपी, क्यूआरटी टीम तैनात होती.

पोलिसांच्या मोठ्या हालचालींमुळे शिवाजी चौक ते टेलिफोन एक्सचेंज भागात एकच खळबळ उडाली होती. सरावाचा उद्देश म्हणजे पोलिसांची त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता तपासणे आणि आपत्कालीन यंत्रणा कार्यक्षम आहे की नाही, हे पडताळून पाहणे. नागरिकांनी या प्रकारच्या सरावामुळे घाबरू नये, उलट यामुळे आपली सुरक्षा यंत्रणा सुरेक्षेबाबात किती सतर्क आहे, हे समजून घ्यावे. दहशतवादी हल्ल्यांसारख्या अनपेक्षित संकटांवर मात करण्यासाठी पोलिस दल नेहमीच तयार आहे, हेच या मॉक ड्रिलद्वारे अधोरेखित करण्यात आले.

Chandrapur : राजकीय दुर्लक्षामुळे वर्धा-वैनगंगा मृत्यूपंथाला

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!