महाराष्ट्र

Amol Mitkari : संभाजी भिडेंचे बेताल वक्तव्य

Sambhaji Bhide : शिवरायांच्या इतिहासावर वाद पेटला

Author

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात नवा वाद पेटला. अमोल मिटकरींनी त्यांच्यावर तीव्र टीका केली.

सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. भिडेंनी शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, असं सांगत ऐतिहासिक घटनांवर नवा सूर लावला.

संभाजी भिडे यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट हल्लाबोल केला आहे. भिडेंच्या या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया देत मिटकरींनी त्यांना आंब्याच्या सिझनशी जोडत बेताल बरळणारे भिडे, असा घणाघात केला.

Maharashtra : विजय वडेट्टीवार यांच्याकडे लोकलेखा समितीची धुरा

भविष्यावर घाला

संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात असल्याचा दावा केला. त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार शिवराय आणि संभाजी महाराजांनी पुढे नेल्याचे सांगत,आधुनिक काळातील राजकीय पक्ष आणि संघटना स्वार्थासाठी इतिहासाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला. मात्र, भिडेंच्या विधानांवर टीका करताना अमोल मिटकरींनी त्यांच्यावर बहुजन समाजाला दिशाहीन करण्याचा गंभीर आरोप लावला.

संभाजी भिडे यांची व्हॅलिडिटी संपली आहे. ते बहुजन समाजातील तरुणांना हाताशी धरून इतिहासाची मोडतोड करत आहेत. शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची विकृतीकरणाची जबाबदारी घेतली जात आहे, मात्र भिडे या इतिहासाच्या खऱ्या रक्षणकर्त्यांवर बोलत नाहीत, असे अमोल मिटकरी यांचे मत आहे. मिटकरींनी छत्रपतींवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या इतर इतिहासकारांवर भिडेंनी मौन का बाळगले, याकडे लक्ष वेधलं.

Crime Branch: नागपूर हिंसाचाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न

शिवराय हे रयतेचे राजे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या वादावर भाष्य करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांना समान न्याय दिल्याचे स्पष्ट केले. हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेत प्रत्येक घटकाला महत्त्व होतं, आणि छत्रपती हे रयतेचे राजा होते, असा निर्विवाद इतिहास आहे. त्यामुळे कोणीही नव्याने शिवाजी महाराजांच्या भूमिकेवर शंका घेण्याचा प्रयत्न करू नये, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी भिडेंना दिला.

संपूर्ण वादानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. भिडे यांच्या विधानावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बहुजन समाजाचे नेते आणि इतिहासाचे अभ्यासक यावर आपली भूमिका मांडण्यास पुढे येतील, हे निश्चित आहे. मात्र, आता या प्रकरणावर पुढे काय कारवाई होते आणि भिडेंच्या या वक्तव्याचा राजकीय प्रभाव किती मोठा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!