प्रशासन

Amravati : कचरा माफिया संपवण्यासाठी कठोर नियम लागू

Strict Action : महानगरपालिकेचे स्वच्छता गुप्तहेर तैनात

Author

अमरावती महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईची घोषणा केली आहे. यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत.

अमरावती महानगरपालिका आता शहराच्या स्वच्छतेसाठी आणखी गंभीर झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोणीही उघड्यावर कचरा फेकताना आढळल्यास त्यांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे. दंडाची रक्कम 500 रुपये ते 5 हजार रुपये पर्यंत असू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या सफाई विभागाने शहरभर कचरा टाकण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत.

पथकांकडून सकाळी आणि संध्याकाळी शहरातील संवेदनशील भागांत गस्त घालण्यात येते. नागरिकांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये म्हणून त्यांना जनजागृती संदेशही दिले जात आहेत. मात्र, तरीही जर कोणी अस्वच्छता पसरवताना आढळले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी यासंबंधी स्पष्ट आदेश दिले आहे. शहरातील अस्वच्छता रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Amaravati : समर्पित शिक्षणसेवेचा गौरव

सुपरवॉच टीम

सफाई कर्मचाऱ्यांना कचरा टाकणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही भागांमध्ये विशेषतः बाजारपेठ, बसस्थानक, उद्याने आणि मुख्य चौकांमध्ये ही समस्या अधिक असल्याने या ठिकाणी विशेष गस्त सुरू आहे. शहराची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने वारंवार केले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात आणि शहराच्या प्रतिमेवरही विपरीत परिणाम होतो.

महापालिकेने यासाठी एक विशेष जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे. अमरावतीतील एनएमसीजी प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळल्याने महापालिकेने तात्काळ कारवाई करण्याचे ठरवले. सफाई विभागाने येथे विशेष कर्मचारी तैनात केले असून, या भागांत सातत्याने स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. नागरिकांना प्रथम समज दिली जाते, परंतु जर कोणी मुद्दाम कचरा टाकताना आढळले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.

Nagpur : रामनवमीच्या रथावरून भाजपचे राजकीय शक्तिप्रदर्शन

प्रशासनाची मोहीम

महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरात स्वच्छता सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. अनेक नागरिक आणि सामाजिक संस्था देखील या मोहिमेत सहभागी होत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहेत. महापालिकेने शहरातील कचराकुंड्यांची नियमित स्वच्छता देखील सुरू केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये या मोहिमेला आणखी गती देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!