
विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. संपूर्ण देशात हे आंदोलन करण्यात येणार आहे. अशात अनेकांनी आता कोर्टातही धाव घेतली आहे.
महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात हे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसनं ईव्हीएमच्या विरोधात इंडिया आघाडीतील घटक पक्षांना या आंदोलनात सोबत घेतलं आहे. त्यानंतर अनेक पराभूत उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील सरसावले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आता न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी याचिका दाखल केली आहे. देशमुख यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील उमेदवार तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी देखील न्यायालयात धाव घेतली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High court) याचिका दाखल केली होती.

कीर्तीकर यांची उच्च न्यायालयानं फेटाळली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला होता. अमोल कीर्तीकर यांना पराभव स्वीकाराला लागला होता. मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची तक्रार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती.
अनेकांनी मागितली दाद
दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीत विजयी झालेत. त्याच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी कोर्टात दाद मागितली आहे. गुडधे पाटील यांच्यासह अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव यांनीही निवडणुकीच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. माजी मंत्री तथा काँग्रेसच्या पराभूत उमेदवार अॅड. यशोमती ठाकूर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही देखील कायदेशीर दाद मागितली आहे. सुभाष धोटे, शेखर शेंडे, संतोष सिंह रावत, सतीश वारजूरकर हे देखील कोर्टाची पायरी चढले आहेत.
कोर्टात गेलेल्या या नेत्यांच्यानंतर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख, चरण वाघमारे हे देखील आता कोर्टात गेले आहेत. अनिल देशमुख आणि चरण वाघमारे यांचा देखील निवडणुकीवर आक्षेप आहे. भंडारा जिल्ह्यातील निवडणूकही चूरसपूर्ण झाली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही निसटता विजय झाला. अवघ्या 208 मतांनी त्यांना विजय मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या दिग्गजांचा पराभव झाला आहे.