महाराष्ट्र

Anil Deshmukh : फॉरेन्सिक अहवालाकडे पोलिसांनी डोळे मिचकावले

Nagpur : देशमुखांच्या आरोपांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडाली

Post View : 28

Author

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आज पुन्हा एकदा तापमान वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत पोलिसांच्या कारवाईतील राजकीय हस्तक्षेपाचा धक्कादायक पर्दाफाश केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर योद्धा अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट तोफ डागली आहे. नागपूरच्या पत्रकार परिषदेत देशमुखांनी सणसणीत आरोप करत एका खळबळजनक रहस्याचा पर्दाफाश केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या वाहनावर दगडफेक झालेल्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या वैज्ञानिक अहवालाकडे डोळे मिचकावले. राजकीय हस्तक्षेपाखाली ‘बी समरी’चा खोटा अहवाल न्यायालयात दाखल केला. हा सारा खेळ फडणवीसांच्या दबावतंत्राने रचला गेल्याचा ठपका ठेवत देशमुखांनी प्रशासकीय यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. या विधानाने राजकीय वातावरणात वादळी उठले आहे. तसेच सत्ताधारी गटात अस्वस्थता पसरली आहे.

देशमुखांनी स्पष्ट केले की, वाहनावर दगडफेकीचा प्रकार खोटा ठरवण्यासाठी पोलिसांनी संगनमताने तपास मोडीत काढला. फॉरेन्सिक अहवालात दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या दिशेने दगड फेकल्याचे नमूद आहे. त्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या आणि डोक्याला जखम झाली. हे पुरावे असूनही पोलिसांनी खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे मत घेऊन ‘घटना घडलीच नाही’ असा दावा करून प्रकरण दाबले. पोलीस अधीक्षकांनी तपास पूर्ण होण्यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन हल्ला खोटा असल्याचे भासवले. ज्यामागे फडणवीसांचा राजकीय दबाव असल्याचा आरोप देशमुखांनी केला. फॉरेन्सिक लॅबवरही पुन्हा गुन्हा दृश्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Akola : सरन्यायाधीशांवर बूट हल्ल्याविरोधात राष्ट्रवादीचा रुद्रावतार

अहवालाचा वैज्ञानिक खुलासा

देशमुखांनी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारावर पोलिसांच्या चुकीच्या कारवाईवर बोट ठेवले. वैज्ञानिक मतानुसार हल्ला झाल्याचे स्पष्ट असतानाही पोलिसांनी स्वतःचा अधिकार ओलांडून खोटी माहिती सादर केली. या गैरप्रकाराने पोलीस यंत्रणेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यात राजकीय हस्तक्षेपाचे निदर्शक समोर आले. देशमुखांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत फॉरेन्सिक अहवाल बदलण्याच्या षडयंत्रकारकांवर आणि खोटा अहवाल दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. हे प्रकरण केवळ तपासातील गोंधळ नाही. तर सत्तेच्या दुरुपयोगाचे प्रतीक ठरले आहे.

देशमुखांच्या या आक्रमक वक्तव्याने फडणवीसांच्या नेतृत्वाखालील प्रशासनावर संशयाचे काळे ढग उद्भवले आहेत. निवडणुकीच्या रणनीतीत वाहन हल्ल्याला खोटा ठरवण्याचा हा डाव असल्याचा दावा करत देशमुखांनी सत्ताधारी गटाच्या खेळी उघड केल्या. या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण मिळाले आहे. फडणवीसांच्या प्रतिक्रीया कुतूहलाचे केंद्र ठरले आहे. देशमुखांच्या या लढ्याने राष्ट्रवादीला नवे धाडस मिळाले असून न्यायाच्या लढाईत ते अग्रेसर राहिले आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!