महाराष्ट्र

मुहूर्त निघाला, Mahayuti मधील पालकमंत्री घोषित

ठरल्यानुसार Devendra Fadnavis यांच्याकडं गडचिरोली

Share:

Author

गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर महायुती सरकारीमधील पालकमंत्र्यांची घोषणा झाली आहे. यासंदर्भातील यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.

महायुती सरकारच्या स्थापनेपासून पालकमंत्र्यांच्या घोषणेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची नाव जाहीर केली आहेत. ठरल्यानुसार गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. त्यांना सहपालकमंत्री म्हणून अॅड. आशिष जयस्वाल हे मदत करणार आहेत. ठाण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आली आहे. मुंबई शहराकडंही शिंदे हेच लक्ष देणार आहेत. पुणे आणि बीडचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं आहे. नागपूर आणि अमरावतीचे पाकलमंत्री म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे काम पाहणार आहे.

अहिल्यानगरचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्याकडं असेल. चंद्रकांत पाटील हे सांगलीचे पालकमंत्री असतील. गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री करण्यात आलं आहे. गणेश नाईक यांच्याकडं पालघर जिल्हा असेल. जळगाव जिल्हा शिवसेनेच्या खात्यात गेला आहे. येथे गुलाबराव पाटील हे पालकमंत्री असतील. यवतमाळला पुन्हा संजय राठोड हेच पालकमंत्री म्हणून मिळाले आहेत. मुंबई उपनगरसाठी दोन मंत्री पालकत्व सांभाळतील. अॅड. आशिष शेलार हे पालकमंत्री असतील तर मंगलप्रभात लोढा हे सहपालकमंत्री नेमण्यात आले आहेत.

प्रदेशाध्यक्षांचा Congress मधील पदाला ना..ना..; महाराष्ट्रात ‘अमित पर्व’

सामंत, रावल यांचीही वर्णी

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्हा देण्यात आला आहे. धुळ्याची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडं असेल. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्री करण्यात आलं आहे. चंद्रपूरचे पाकलमंत्री यवतमाळमधील भाजपचे मंत्री डॉ. अशोक उईके हे असतील. साताऱ्यात शंभूराज देसाई हे पालकमंत्री असतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आलं आहे. शिवेंद्रसिंह भोसले हे नंदूरबारचे पाकलमंत्री राहणार आहेत. जयकुमार गोरे हे सोलापूर तर नरहरी झिरवाळ हे हिंगोलीचे पालकमंत्री असतील.

भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून संजय सावकारे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांना पालकमंत्री करण्यात आलं आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे असतील. बुलढाण्याची जबाबदारी मकरंद जाधव यांच्यावर देण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे असतील. अकोल्याच्या पालकमंत्री पदावर आकाश फुंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाबासाहेब पाटील हे गोंदियाचे पाकलमंत्री राहतील. कोल्हापूरमधेही दोन मंत्री असतील येथे प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्री करण्यात आलं आहे. माधुरी मिसाळ या सहपालकमंत्री असतील. वर्ध्यात पंकज भोयर यांनाच पालकमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. परभणीचे पाकलमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर असतील.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!