महाराष्ट्र

बुलढाण्यातील NCP मध्ये सुरू राजीनामा नाट्य 

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांचे जिल्हाध्यक्षांवर आरोप 

Author

बुलढाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे खापर जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यावर फोडत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दुसरीकडे त्यांना अगोदरच निष्काशित करण्यात आल्याचे सांगून हे त्यांचे राजीनामा नाट्य आहे, असा पलटवार  जिल्हाध्यक्ष नाझेर काझी व त्यांच्या समर्थकानी केला आहे.

अनुजा सावळे यांनी या अंतर्गत वादाला तोंड फोडले. सावळे यांनी आपल्या ‘फेसबुक पेज’वर राजीनाम्याची पोस्ट शेअर केली आहे. राजीनाम्यावर तारीख 19 डिसेंबर  2024 आहे. तरी त्यांनी 5 फेब्रुवारी रोजी समाज माध्यमावर राजीनामा पत्र टाकले.

अपमानजनक वागणूक 

राजीनामा पत्रात अनुजा सावळे यांनी म्हटले आहे की, मी मागील 4 वर्षांपासून निष्ठेने पक्षाचे काम केले आहे. प्रामाणिकपणे महिला संघटनेचे काम वाढवले. मात्र जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी सतत मला अपमानजनक वागणूक दिली आहे. निष्ठावान लोकांना डावलून पक्ष संघटना टिकणार नाही, असे सावळे म्हणाल्या.

सगळ्यांच्या नाकाखालून भंडारा Zilla Parishad मधून पाच गायब

जातीयवाद फोफावला तर सामान्यांना न्याय मिळणार नाही. मराठा समाजातील सक्षम महिला म्हणून अशा प्रकारे मला राजीनामा द्यावा लागणे निराशाजनक आहे असेही अनुजा सावळे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. यामुळे अजित पवार गटात काहीसे वादळ उठले.

पक्ष विरोधी कारवाई

अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी अनुजा सावळे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. काझी म्हणाले, हे आरोप साफ चुकीचे आहेत. याउलट सावळे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले. सिंदखेड राजा मतदासंघांचे उमेदवार मनोज कायंदे यांचा सावळे यांनी प्रचार केला नाही. महिलांचा अपमान करणे ही आपली आणि पक्षाची संस्कृती नाही. त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये राजीनामा दिला आहे आणि पोस्ट आता टाकली. हे त्यांचे राजीनामा नाट्य आहे, असेही नाझेर काझी म्हणाले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते तुकाराम अंभोरे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनीष बोरकर यांच्यासह आणखी पदाधिकाऱ्यांनी या वादात उडी घेतली आहे. अनुजा सावळे यांचे आरोप अतिशय खोटे आहेत, असे ते म्हणाले. पक्षविरोधी कामे केल्यामुळे अनुजा सावळे यांना पूर्वीच निष्कासित करण्यात आले आहे. सिंदखेड राजा मतदार संघाच्या लढतीत त्यांनी उमेदवार मनोज कायंदे यांच्या विरोधात कामे केली. त्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्याकडे लगेच करण्यात आली होती. त्यांना निष्कासित सुद्धा करण्यात आल्याचे तुकाराम अंभोरे यांनी स्पष्ट सांगितले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!