महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : यंदाच्या होळीला महायुतीविरुद्ध शिमगा

Mahayuti : देवाभाऊंच्या मंत्रिमंडळावर आरोपांची पिचकारी

Post View : 16

Author

रंगांचा उत्सव होळी जवळ येत आहे. पण त्यापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात धुळवडीला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला घरी बसविणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सध्या आघाडीनं कंबर कसली आहे. पहिली विकेट घेण्यात आघाडीचे नेते यशस्वी झाले आहेत. 

होळीच्या उत्सवात लोक एकमेकांवर विविध प्रकारचं रंग उधळतात. पण सध्या महाविकास आघाडी महायुती सरकारला केवळ काळं कसं फासता येईल, याचाच विचार करीत आहे. बीडमध्ये संरपंचाची हत्या करीत वाल्मिकी कराड आणि त्याच्या साथीदारांनी रक्तरंजीत होळी खेळली. हे डाग थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्यावर लागले आहेत. अजित पवारांनी ‘बेनिफिट ऑफ डाऊट’चं कारण देत धनुभाऊंना होणाऱ्या चिखलफेकीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना फारसं यश आलं नाही. अखेर मुंडे यांच्या सत्तेचा रंग फिका पडला.

मुंडे यांच्यानंतर आता विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या मागं हात धुवून लागले आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं बलात्कार शांततेत सुरू आहे, यावरून निर्माण झालेलं वादळ अद्यापही शांत झालेलं नाही. अशात आणखी एका मंत्र्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करीत आहेत. जयकुमार गोरे हे त्या मंत्र्याचं नाव. एका महिलेला अश्लील फोटो पाठविण्याला आरोप त्यांच्यावर होत आहे. आता हे प्रकरण थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पर्यंत जाणार आहे. त्यामुळं फडणवीस सरकारच्या रंगात भंग पडला आहे. महाविकास आघाडीला फडणवीस यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. त्याचीच परतफेड करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

Washim : हसन मुश्रीफ यांना GPS मध्ये वाट सापडली नाही

पतनाची ‘प्रतिज्ञा’

महाविकास आघाडीनं काहीही करून महायुती सरकारचं पतन करण्याची प्रतीज्ञा घेतलेली दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अमृत योजनेत मोठा गैरप्रकार झाला आहे. यावरून सध्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केला. अलीकडेच कोर्टानं यासदंर्भात प्रशासनाला जाब विचारला. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावतीनं कोर्टात प्रतिज्ञालेख दाखल करण्यात आलं आहे. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात हा गैरप्रकार झाल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट हा आरोप केला आहे. त्यातून शिंदे यांच्या पांढऱ्या शर्टावर पडलेले ‘डाग अच्छे नही’ असं दाखवून देण्याचा प्रयत्न होत आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विधिमंडळाच्य दोन्ही सभागृहात रणकंद होईल हे सगळ्यांनाच ठाऊक होते. पण एकनाथ शिंदे यांनी दमदार बॅटिंग केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानाचा मुद्दा त्यांनी पुढं केला. यावरून सत्ताधारी आमदारांनीच नारेबाजी सुरू केली. त्यानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित झालं. यावरून भाजपप्रणिक हा गोंधळ होता असं ठामपणे आघाडीचे नेते सांगत आहेत. शिंदे यांनी महायुतीचा एक बुरूज सांभाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वडेट्टीवारांनी प्रतिज्ञालेखावरून शिंदे यांना भ्रष्टचारी ठरविलं आहे. यातून महायुती सरकारवर काळं वंगण टाकण्याची एकही संधी आघाडी सोडत नसल्याचं दिसत आहे.

Mahayuti : देवाभाऊ मंत्र्यांना म्हणाले; चांगलं ‘बिहेव्ह‘ करा

कोणतं पावडर वापरणार?

भाजपमध्ये पाप, भ्रष्टाचार, गुन्हे धुतले जातात. भाजपमध्ये खास वॉशिंग मशिन असल्याचा आरोप होतो. आता भाजपसोबत सत्तेत बसलेल्या अनेक मंत्र्यांवर पुराव्यांसह आरोपांचे शिंतोडे उडत आहेत. सरकारची प्रतीमा वाचविण्यासाठी आता भाजप कोणती वॉशिंग मशिन अन् कोणतं वॉशिंग पावडर वापरणार हे बघण्यासारखे राहणार आहे. ग्रामीण भागामध्ये होळीच्या काही दिवसांपूर्वी ‘होळीची बोंब लागली’ असं म्हटलं जातं. या दिवसांमध्ये डोक्याचा ताप वाढतो असं मानलं जातं. अशीच होळीची बोंब सध्या विरोधकांनी उठवली आहे. विजय वडेट्टीवार, संजय राऊत, रोहित पवार हे रोज नवनवे आरोप करीत आहेत. लवकरच होलिका दहन होणार आहे. यंदाच्या होळीत महाविकास आघाडी अन् महायुती यातील कोणकोण भस्मसात होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!