महाराष्ट्र

वाल्मिक कराडबाबत BJP सरकारचे अपयश

Atul Londhe म्हणतात राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस हतबल

Author

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्याप्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शरण आला. त्याला शोधू न शकणे हे पोलिसांचं अपयश असल्याचं अतुल लोंढे म्हणाले.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला आहे. यावरून महाराष्ट्र पोलिसांचं अपयश स्पष्ट होते असा आरोप काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा यावरून स्पष्ट दिसतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयश झाले आहेत. त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा, असं अतुल लोंढे म्हणाले. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा तपास विद्यमान न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली करणे गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

महाराष्ट्र पोलिसांचा मोठा दबदबा आहे. नावलौकिक आहे. मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जायची. अशा सक्षम पोलिस दलाची अवस्था आता दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी 20 दिवस गायब होता. पोलिस व सीआयडीला वाल्मिक कराड सापडला नाही. आता तो शरण आला. हे पोलिस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा प्रकार गंभीर आहे. हा प्रकार पाहता याचा तपास विद्यमान न्यायमूर्ती यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

बीडवरून Politics

बीड मधील घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, राज्यातील पोलिस दल व सीआयडी आजही सक्षम आहे. पण ते राजकीय दबावाखाली आहेत. त्यामुळं त्यांचं मनोबल कमजोर होत आहे. आरोपी शरण येतो. पण त्याला पकडू शकत नाही. ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. बीड प्रकरणाने सरकारचे पीतळ उघडं पडलं आहे. सक्षम नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गवगवा केला जातो. त्यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे, असं अतुल लोंढे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचं गृहशहर असलेल्या नागपूरमध्ये सात दिवसात सात खून झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. मीडियातून स्वतःचे कौतुक थांबवावे, असेही अतुल लोंढे म्हणाले. बीड प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. बीड मधील गुन्हेगारीला सत्ताधारी पक्षाचे आमदार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ म्हणतात. बीडमधील गुन्हेगारीला आळा घालून राजकीय आशीर्वादाने फोफावलेली आहे. ही विषवल्ली कायमची नष्ट करावी. यामागे ज्यांचा हात आहे, त्यांनाही अद्दल घडवावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!