महाराष्ट्र

Atul Londhe : फुलेंना आता तरी बेडीमुक्त करा

Phule Movie : विरोध, वेदना आणि विजयानंतरची कहाणी  

Author

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या अडचणीत सापडलेला फुले चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर झळकला असला, तरी या चित्रपटाभोवतीचं वादळ अजूनही शमलेलं नाही. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या चित्रपटाने एका बाजूला रसिकांची वाहवा मिळवली असतानाच, दुसऱ्या बाजूला काही संघटनांचा रोषही ओढवून घेतला आहे.

संसाराच्या नावे घालूनियां शून्य। वाढता हा पुण्य धर्म केला।। या संतवचनांतून स्फूर्ती घेणाऱ्या, संपूर्ण समाजाला आपल्या कुटुंबाप्रमाणे समजणाऱ्या महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर आधारित फुले हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट अखेर 25 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यांनी आयुष्यभर समाजाच्या अन्यायाला सामोरं जात हालअपेष्टा सहन केल्या, त्यांच्याच जीवनावर आधारित चित्रपट करमणूक कराच्या बेडीत अडकलेला आहे. काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी पुढे येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे.

फुले हा चित्रपट महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारकतेचा आरसा आहे. समाजाला जातीयतेच्या चौकटीबाहेर नेणारा असा सिनेमा प्रत्येकाने पाहावा, असे अतुल लोंढे यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, फुले चित्रपट समाजमनाला जागं करण्याचं काम करतो. शिक्षण हेच खरे मुक्तीचं साधन आहे, हे ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी कृतीतून दाखवून दिलं. प्रतीक गांधी आणि पत्रलेखा या जोडीने साकारलेल्या या हिंदी चित्रपटात फुलेंचा समाजसुधारणेचा प्रवास, त्यांचा अपार त्याग आणि अचल निर्धार प्रभावीपणे उभा करण्यात आला आहे. तिच्या पाठीशी तो आणि त्याच्या पाठीशी समाजजागृतीचे विचार होते.

Nagpur : कन्हानमध्ये प्रशासन झोपेत, माफिया फुल ड्युटीवर

कथानकात मूल्यांचा पगडा

चित्रपटगृहात झळकण्याआधीच या चित्रपटाभोवती वादाचा धुरळा उठला होता.  कारण ठरलं ब्राह्मण महासंघाचं आक्षेप. राज्यातील ब्राह्मण संघटनांनी चित्रपटातील काही दृश्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फुलेंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आजच्या पिढीने विचार करावा, हीच या चित्रपटाची खरी देणगी आहे. सुरुवातीपासूनच चित्रपटाची कथा एक सामाजिक उदात्ततेचा ध्वज उंचावत पुढे सरकते. बालवयात वडिलांनी दिलेल्या मूल्यांची बीजं ज्योतिबांच्या मनात रोवली जातात आणि तरुण वयात त्या बीजांना संघर्षाचं खतपाणी मिळतं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या प्रतिष्ठेचा आणि आयुष्याला पणाला लावणारे फुले दाम्पत्य शाळा सुरू करतात, पण त्यांना विरोधाचा धक्का बसतो.

Devendra Fadnavis : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश

समाजाच्या रुढींनी त्यांच्यावर चिखलफेक, अपमान, अगदी प्राणघातक हल्ल्यांचाही प्रसंग ओढवतो. फुले चित्रपट म्हणजे केवळ एका दाम्पत्याची कथा नाही, तर ती एका युगाच्या बदलाची सुरुवात आहे. जातीभेद, स्त्रीशिक्षण, समाजातील अंधश्रद्धा याविरोधात उभ्या राहिलेल्या फुलेंचा हा प्रवास आजही तितकाच स्फूर्तिदायक आहे. चित्रपटातून केवळ भूतकाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नाही, तर आजच्या काळातही अशा क्रांतिकारक विचारांची गरज का आहे, हे जाणवते. समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपल्या मर्यादेत काम केल्यासच खरी प्रगती शक्य आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!