महाराष्ट्र

अचलपुरात Bacchu Kadu अन् Pravin Tayde यांच्यात वॉर

प्रहारच्या पक्षाध्यक्षांनी केली पोलिसांकडं तक्रार दाखल

Author

प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू आणि प्रवीण तायडे यांच्यात राजकीय युद्ध सुरू झालं आहे. आता बच्चू कडू यांनी थेट तायडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अमरावती जिल्ह्यात राजकीय नेत्यांचं वैर सतत चर्चेचा विषय असते. अमरावती मधील अनेक राजकीय नेत्यांमध्ये वाद आहे. काही नेत्यांचे वाद तर विकोपाला गेले आहेत. काहींचे वाद सवोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहेत. आता अचलपूर येथील माजी आमदार बच्चू कडू विरुद्ध प्रवीण तायडे यांच्यात राजकीय युद्ध सुरू झालं आहे. या वादातून बच्चू कडू यांनी भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात पोलिसांकडं तक्रार दाखल केली आहे. तायडे यांनी केलेल्या अर्वाच्य वक्तव्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. त्यामुळं त्यांनी आता तायडे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

प्रहार संघटनेतर्फे अमरावती पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलं. आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंच्या नादाला लागू नये. आधी त्यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा सामना करावा असं आव्हान आमदार तायडे यांना देण्यात आलं आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी आमदार प्रवीण तायडे यांना खुलं आव्हान दिले आहे. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनाही प्रश्न पडला आहे. प्रवीण तायडे हे सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत. त्यामुळं त्यांच्या विरोधात कोणती कारवाई होते, याकडं सर्वांचं लक्ष आहे.

चंद्रपुरातील अवैध Oyo Hotels विरोधात आमदार सरसावले

Amravati मध्ये पुन्हा वाद

अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्यानं राजकीय वाद निर्माण झाला आहे. अमरावतीच्या बहिरम येथे सध्या बहिरम बाबांची यात्रा सुरू आहे. बहिरम यात्रेत आमदार प्रवीण तायडे यांचे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. हे फलक फाडण्यात आले आहेत. परिणामी आता भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. अचलपूरमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांचा पराभव झाला आहे. प्रवीण तायडे यांनी त्यांचा पराभव केला होता. तेव्हापासून तायडे विरुद्ध कडू असा वाद रंगला आहे. बच्चू कडू दिव्यांग कल्याण अभियानाचे अध्यक्ष होते. त्यांना या पदावरून काढण्यात यावं, अशी मागणी आमदार तायडे यांनी केली होती. त्यानंतर लगेचच आमदार कडू यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. स्वत:ला असलेली पोलिस सुरक्षाही काढण्याची मागणीही कडू यांनी केली होती.

सध्या अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू यांच्याशी अनेक नेत्यांचे वाद आहेत. माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा हे कडू यांचे कट्टर राजकीय वैरी आहेत. महायुती सरकारमध्ये असताना बच्चू कडू यांनी सरकारशीच वैर घेतले. सरकार विरोधात मोर्चा काढला. निवडणुकीपूर्वी त्यांनी तिसरी आघाडी तयार केली. मात्र त्यांच्या आघाडीचा सपाटून पराभव झाला. इतकेच काय तर आघाडीची मोट बांधणाऱ्या कडू यांचाही पराभव झाला. त्यानंतर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांकडून मत मागविलं. सत्तेत राहावं की विरोधी पक्षात जावं असा कौल कार्यकर्त्यांना मागितला. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!