महाराष्ट्र

Bacchu Kadu : विधान परिषदेच्या दारात ठोठावतोय ‘प्रहार’

Amravati : अचलपूर शिक्षक मतदारसंघात बच्चू कडूंचा कमबॅक

Post View : 34

Author

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर प्रहारचे बच्चू कडू नव्या रणनितीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजकारणात पराभव हा शेवट नसतो, तर नव्या संधीचा आरंभ असतो. हे पुन्हा एकदा दाखवून देण्याच्या तयारीत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू. अमरावती अचलपूरमधून सलग चार वेळा आमदार म्हणून विजय संपादन केलेल्या आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या कडू यांचा आता नव्या आखाड्याकडे मोर्चा वळलेला दिसतोय. तो आखाडा म्हणजे विधान परिषदेतील अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ. राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा आहे की बच्चू कडू या मतदार संघातून विधान परिषद निवडणूक लढवणार आहेत.

चर्चा अधिक ठोस ठरते, कारण प्रहार शिक्षक संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडू यांनी या निवडणुकीत उतरावे, अशी जोरदार मागणी केली. यावर कडू यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत, शिक्षकांशी चर्चा करूनच निर्णय घेईन, असे स्पष्टपणे सांगितले आहे. 2004, 2009, 2014 आणि 2019 या सलग चार निवडणुकीमध्ये अचलपूर मतदारसंघात विजयश्री खेचून आणणाऱ्या बच्चू कडूंना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. मात्र, राजकीय इच्छाशक्ती असलेले नेते हार पत्करत नाहीत आणि बच्चू कडूंनीही तसंच केलं आहे.

Siddharth Kharat : लग्नात तलवार फिरवणाऱ्या आमदारावर कायद्याची टाच

नेतृत्वाची आगामी लढाई

आपली नजर त्यांनी आता विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघावर केंद्रित केली आहे. या मतदारसंघात अमरावतीसह अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात शिक्षकांमध्ये मोठा प्रभाव असलेल्या कडूंच्या राजकीय पुनरागमनाची शक्यता आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अपक्ष आमदार किरण सरनाईक  करत आहेत. त्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. अर्थातच, त्याआधी या मतदारसंघात चुरशीची निवडणूक अपेक्षित आहे. सरनाईक यांचे वर्चस्व निश्चितच आहे. पण कडू यांच्या आगमनाने राजकीय समीकरणं बदलू शकतात.

यातच प्रहार शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात कडू यांच्या नावाला मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा हा त्यांच्या संभाव्य उमेदवारीची नांदी मानली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षकांमध्ये त्यांचा प्रभाव आणि व्यक्तिगत संपर्कसंपदा ही त्यांच्या बाजूने जाऊ शकते. या निवडणुकीकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. कारण बच्चू कडू हे केवळ आमदार नाहीत, तर त्यांचा ठसा उमटवणारा एक प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या भाषणशैलीपासून ते मुद्द्यांवरच्या भूमिका ठाम असतात, आणि विधान परिषदेच्या सभागृहात अशा एका नेतृत्वाची उपस्थिती अनेकांच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरू शकते.

Anil Deshmukh : शिक्षक भरती घोटाळा व्यापम पेक्षा मोठा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!