महाराष्ट्र

Bachchu Kadu : सातबारा कोरा करा!

Farmers Issues : धरणीची बाजू घेऊन बच्चू कडू मैदानात

Author

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू रस्त्यावर उतरले आहेत. ‘सातबारा कोरा करा’ ही 138 किमीची पदयात्रा 7 जुलैपासून सुरू होत आहे.

शेतकरी-कष्टकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक केल्याने आता शेतकऱ्यांनीच एकत्र येत लढ्याची मशाल पेटवली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी यवतमाळमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार हल्ला चढवत ‘सातबारा कोरा करा’ या 138 किलोमीटरच्या पदयात्रेची घोषणा केली आहे. या यात्रेचा प्रारंभ 7 जुलैपासून भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ (जिल्हा अमरावती) येथून होणार आहे. समारोप 14 जुलैला चिलगव्हाण (जिल्हा यवतमाळ) येथे होणार आहे.

ही यात्रा केवळ शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी नसून, त्यांच्या हक्काच्या लढ्याचा आवाज ठरणार आहे. शेतमजूर, शेतकरी, विधवा आणि दिव्यांग यांच्या जीवनातील दुःख, वेदना आणि अन्याय समजून घेत हा लढा व्यापक बनवण्याचे प्रयत्न कडू करत आहेत.

Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात येऊन उभा रहा, मग कळेल तुझ्या भोजपुरीची लायकी

शोषणाविरोधात जागृतीचा एल्गार

देशभरात राजकीय, धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाच्या सावलीत खरी हत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची होत आहे. हे सत्ताधाऱ्यांचे धोरण केवळ शेती विकण्याचेच नाही, तर शेतकऱ्यांचे सर्वस्व हिरावून कंपनीराज आणण्याचे आहे. मागील तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही आकडेवारीच सरकारच्या संवेदनशीलतेचा पर्दाफाश करते. बच्चू कडू म्हणतात की ही यात्रा कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नसेल. ती एक जनआंदोलनाची ठिणगी आहे. यामध्ये प्रत्येक शेतकरी आणि शेतमजुराने सहभागी व्हावे, अशी जाणीवपूर्वक रचना करण्यात आली आहे.

सत्ताधाऱ्यांचे शेतकरीविरोधी धोरण हे इतके निर्दयी आहे की, आजवर साडेतीन लाख शेतकरी कुटुंबातील महिलांचे कुंकू पुसले गेले. ‘सातबारा कोरा करा’ यात्रा ही त्यांचाच मूक आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. हा आक्रोश आता महागात पडणार, कारण शेतकरी जागा झाला आहे. मजुरांना सहा महिन्यांपासून मजुरी नाही. काम करणाऱ्यांचे महत्त्व सरकारच्या नजरेत उरलेले नाही. विधवा, दिव्यांग, शेतमजूर यांच्या जीवनातील संकटांवर सरकार डोळेझाक करत आहे. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून हे खरे वास्तव समोर आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी उलगडला महाराष्ट्राच्या मातीतील इतिहास 

धोरणांचा अभाव

बच्चू कडूंनी मग्रारोहायो योजनेत पेरणीचा समावेश करून, त्यामध्ये विधवा व दिव्यांग शेतकऱ्यांनाही जोडण्याची गरज व्यक्त केली आहे. हे मागणे केवळ शेतकऱ्यांच्या हिताचेच नाही, तर कृषी क्षेत्राला एक नवे भान देणारे आहे. राज्यात शेतीचे व्यापारीकरण सुरू आहे. खत, बियाणे आणि औषध उद्योगांचा 4 लाख कोटींचा व्यापार आहे. मात्र शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेणखताला कोणतीही सबसिडी नाही. ही शेतकरीविरोधी मानसिकता आता बदलण्याची गरज आहे.

गायींच्या रक्षणाच्या घोषणा देणाऱ्या सरकारकडे भाकड गायींसाठी कोणतेही ठोस धोरण नाही. सत्तेवर बसताना प्रभू श्रीरामाची शपथ घेणाऱ्या सरकारने जबाबदारी स्वीकारावी, हा मूलभूत संदेश कडू यांनी या माध्यमातून दिला आहे. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, ही यात्रा सरकारविरोधात घोषणाबाजीसाठी नाही, तर शेतकरी आणि मजुरांच्या न्याय्य हक्कांची पुनर्स्थापना करण्यासाठी आहे. हे आंदोलन एक क्रांती आहे. ‘सातबारा कोरा करा’ म्हणजेच शेतकऱ्याच्या हक्कांचा दस्तऐवज पुन्हा शुद्ध करण्याची मोहीम.

यात्रेचा मूळ उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे, शासनाच्या असंवेदनशील धोरणांचा निषेध करणे आणि एक सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करणे हा आहे. बच्चू कडू यांनी सडेतोड भाषेत हेच स्पष्ट केले आहे की, ‘सातबारा कोरा करा’ ही चळवळ केवळ मागण्यांची यादी नसून, शेतकरी हिताची लढाई आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!