
बार्शिटाकळी पोलिस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांना आमदार हरीश पिंपळे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपांनंतर तात्काळ बदली करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या अशोभनीय वागणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आज सकाळी ठाणेदाराने आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली आहे. या प्रकरणामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. तात्काळ पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांना अकोला पोलिस नियंत्रण कक्षात स्थानांतरित केले गेले आहे. अकोला पोलिस अधीक्षक IPS यांना या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सत्ताधारी भाजपच्या मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रातील आमदार हरीश पिंपळे यांनी या प्रकरणाची दखल घेत तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी ठाणेदाराच्या असभ्य वर्तनामुळे निलंबित करण्याची मागणी केली आहे. यावेळी, गोवंशाच्या अवैध वाहतुकीच्या संशयावरून आमदार पिंपळे यांचे कार्यकर्ते हरीश वाघ यांना बार्शीटाकळी पोलीस ठाण्यातील ठाणेदाराशी संपर्क साधण्याची वेळ आली. मात्र, या संपर्कामुळे ठाणेदाराचा संताप उफाळला आणि आमदाराच्या कार्यकर्त्याशी अश्लील भाषेत संवाद साधला.

राज्यात गुन्हेगारी वाढ
राज्यात गुन्हेगारीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. त्यातच पोलिसांकडून लोकप्रतिनिधींना व त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्लील भाषेत अपमानित करण्यात येत असल्याचे बार्शीटाकळी प्रकरणातून दिसून आले. मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे हे सलग चार वेळा निवडून आलेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्याला अशा प्रकारे शिवीगाळ होणे ही फडणवीस सरकारच्या पोलिस प्रशासनावरची मोठी छटा ठरत आहे.
गोवंशाच्या अवैध वाहतुकीच्या संशयावरून हरीश वाघ या कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. पोलिसांनी ती दुर्लक्ष करत वाहन सोडून दिले. यानंतर आमदार पिंपळे यांनी थेट ठाणेदार तुनकलवार यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली. चौकशीत असे कळले की ठाणेदाराने असभ्य व अत्यंत अपमानास्पद भाषेत प्रतिक्रिया दिली. यानंतर संतप्त ठाणेदाराने पुन्हा कार्यकर्त्याशी संपर्क साधत अश्लील शिवीगाळ केली. या संवादांची ध्वनीफीत प्रसारित झाल्यानंतर घटना अधिक गंभीर बनली.
Nitesh Rane : राज अन् उद्धव स्टेजवर, पण युतीची स्क्रिप्ट रश्मी ठाकरेंच्या हातात
नवीन पोलिस निरिक्षकाची नियुक्ती
राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसांची वागणूक यावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अनेकांनी या वादग्रस्त घटनेवर प्रतिक्रिया देताना पोलिसांच्या अशा वागणुकीला कठोर निषेध केला आहे. राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व असले तरी पोलिस प्रशासनाच्या वर्तनाने राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेला धक्का पोचला आहे. यामुळे अजून अधिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात गुन्हेगारी आणि पोलिसांची मुजोरी यांचे घातक मिश्रण आता थेट लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेवर परिणाम करू लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पोलिसांच्या नियंत्रणासाठी नेहमीच कडक कारवाईचा दावा करते. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या आमदारालाच जर ठाणेदार अश्लील भाषेत शिवीगाळ करत असेल, तर शासनाचे सशक्त प्रशासन हे केवळ कागदोपत्रीच राहते, असे यातून बोलले जात आहे.