महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: धनंजय मुंडेंचा गेम ओव्हर

Santosh Deshmukh: मस्साजोग हत्याप्रकरणी फडणवीसांचा कठोर निर्णय

Author

बीडच्या मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात घडलेल्या एका भयंकर हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, या प्रकरणाला अजून एक वेगळे वळण मिळाले, जेव्हा या हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकांच्या डोळ्यात पाणी येईल असे अमानुष व्हिडीओ आहेत, हत्याकांडाचे.

घटनेचा परिणाम असा झाला की अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी या विषयावर चर्चा केली. मात्र आज धनंजय मुंडे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करणार आहेत.

Nagpur : रेल्वे महसूल वाढवणारे नागपूरचे टिकटगुरू

विरोधकांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी आरोप केला की, सरकारचे काळीज आता दगडासारखे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा केवळ राजीनामा घेऊ नये, तर त्यांना थेट बरखास्त करावे.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, गुंडांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. खून होत आहेत, बलात्काराच्या घटनाही वाढत आहेत, पण सरकार मूग गिळून बसले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी इशारा दिला की, जोपर्यंत धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही. फडणवीस सरकारने फक्त त्यांना पदावरून हटवू नये, तर गरज पडल्यास त्यांना थेट जेलमध्ये टाकावे.

Aditi Tatkare : लाडक्या बहिणींना महिला दिनी गिफ्ट

राज्यभरात संताप

हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय सहकारी असल्याचे उउघडकीस आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील प्रचाराचे आणि जिल्ह्यातील राजकीय कारभाराचे प्रमुख सूत्रधार म्हणून काम पाहत होता. त्यामुळे या हत्येच्या तपासादरम्यान त्याचे नाव समोर येताच धनंजय मुंडे यांच्यावरही राजकीय दडपण आले.

धनंजय मुंडेंचा या प्रकरणात थेट सहभाग नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सुरुवातीला हे प्रकरण त्यांच्या पक्षावर सोडले होते. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील संतापाचा आगडोंब उसळला आणि अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडले.

Harshwardhan Sapkal : पाच मार्चला ठरू शकतो विरोधी पक्षनेता

कॅमेऱ्यात दृश्य कैद

संपूर्ण प्रकरणातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपींनी केलेला अमानुष अत्याचार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास 15 व्हिडिओ आणि 8 फोटो जप्त केले आहेत. या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसते.

विशेष म्हणजे, आरोपींनी हत्या केल्यानंतर आनंदोत्सवही साजरा केला. हे फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास थांबला आहे. पोलिस तपासानुसार, मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी हा संपूर्ण कट रचला होता. हत्या करण्याआधी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना क्रूरपणे मारहाण केली.

Maharashtra Budget Session : महायुतीचे ‘कुबेर’ करणार नवी जादू!!

सरकारसमोर आव्हान

हत्येच्या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटावरही मोठे दडपण आले आहे. विरोधकांनी या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

राज्यातील जनतेत सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात जलदगतीने कारवाई करावी आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. सरकारने यापुढे अशा घटनांना कशी प्रतिबंध घालणार, यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा या प्रकरणाचा शेवट नाही, तर सुरूवात आहे. आता विरोधक या प्रकरणावरून सरकारला अजून धारेवर धरणार, तर दुसरीकडे, या प्रकरणातील इतर आरोपींवर कठोर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली सत्ता असो वा गुन्हेगारी, सत्य लपून राहत नाही. आणि जर कुणी कायद्याच्या बाहेर जाऊन गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत असेल, तर शेवटी न्यायाच्या चक्रात तो सापडतोच.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!