महाराष्ट्र

Anuja Kedar : प्रचंड वैभव; अहंकाराचा लवलेश नाही, जोडीला आध्यात्म, सोज्वळतेची जपणूक

Women's Day Special : ‘डाऊन टू अर्थ’ आहेत माजी मंत्री सुनील केदार यांच्या अर्धांगिती

Post View : 28

Author

कधीकधी चहापेक्षा केटली गरम असते. नेत्यापेक्षा त्याच्या नातेवाईकांना जास्त अहंकार असतो. पण काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या कुटुंबातील सदस्यांबाबत हे समीकरण अगदी उलट आहे. सुनील केदार यांच्या अर्धागिनी अनुजा केदार यांच्याबाबत बोलायचं झाल्यास ‘डाऊन टू अर्थ’ असंच म्हणावं लागेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात सुनील केदार हे नाव ठाऊक नाही असा क्वचितच कोणी सापडेल. शिवाचा सगळा ऊर्जास्रोत जसा आदीशक्तीकडून होता. अगदी तसाच सुनील केदार यांची भक्कम ढाल आहेत त्यांच्या अर्धांगिनी अनुजा केदार. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘द लोकहित लाइव्ह’नं राजकीय क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या नेत्यांच्या जोडीदारांबद्दल माहिती संकलित केली. त्यातून अनेकांचं साधं राहणीमान पुढं आहे. असंच राहणीमान असलेल्या महिलांपैकी एक म्हणजे अनुजा केदार. घरी प्रचंड वैभव असलं तरी अहंकाराचा लवलेश नाही, जोडीला आध्यात्म, सोज्वळतेची जपणूक हे अनुजा केदार यांच्या बाबतीत म्हणावं लागेल.

अनुजा केदार या अत्यंत धार्मिक आहेत. नवचंडी, शतचंडी, देवीचे पाठ, खंडोबाची पूजा असं सारं काही अनुजा केदार यांच्या पुढाकारानं केदार परिवारात होत असतं. देवाब्राह्मणांचा प्रचंड आदरसत्कार अनुजा केदार आणि एकूणच केदार परिवाराकडून केला जातो, अशी माहिती मिळाली. सुख असो अथवा संकट अनुजा केदार यांनी देवीवर प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळं कोणत्याही प्रसंगी त्या जगद्जननीला शरण जातातच. त्यांची आध्यात्मिक ऊर्जा नेहमीच सुनील केदार यांच्यासोबत असल्याचं अनेक प्रसंगांमधून दिसून आलं आहे. अलीकडेच अनुजा केदार यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. निवडणुकीत त्यांना विजय मिळाला नाही. पण त्याचं कोणतंही दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दिसलं नाही.

Sapna Munagntiwar : समाजकारण, देशभक्ती, देवभक्तीचा मिलाफ

जबाबदारीची जाणीव

केदार परिवाराच्या संपर्कात राहणारे सगळेच अनुजा केदार यांच्या साध्या स्वभावाबद्दल भरभरून बोलतात. केदार परिवारात पूजन, हवन आदी करणारे आचार्य सांगतात की, अनेक व्रतवैकल्य करताना कडक नियम पाळावे लागतात. अनुजा केदार हे सगळं आनंदानं करतात. कधीधी अनवाणी पायानं अन् कडक उपवासही करतात. नवचंडी, शतचंडी अशा मोठ्या आयोजनाच्या प्रसंगी अनुजा आणि सुनील केदार प्रसंगी चटईवरही झोपतात. या सगळ्यात अनुजा केदार यांचा पुढाकार सगळ्यात अधिक असतो. सुनील केदार आमदार त्यानंतर मंत्रीही झालेत. परंतु अनुजा केदार यांच्या वागण्याबोलण्यात कधीही अहंकाराचा लवलेश दिसला नाही.

अनेक उत्सवांच्या प्रसंगी अनुजा केदार या स्वत: पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. त्यावेळी लागू असलेलं सोवळंही पाळलं जाते. स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. अनेक धार्मिक कार्य करताना अनुजा केदार यांना कधीही भौतिक सुख, पद, पैसा, प्रतिष्ठा यासाठी प्रार्थना करताना बघीतलं नाही. उलट त्या आनंद आणि परमेश्वराच्या पूर्ण कृपेसाठी प्रार्थना करतात. परमेश्वराची पूर्ण कृपा झाली तर काहीच कमतरता राहणार नाही, असं त्या नेहमीच बोलतात असं एका आचार्यानं ‘द लोकहित लाइव्ह’शी बोलताना सांगितलं. जोडीदार कसा असावा, याचं अनुजा केदार या मूर्तिमंत उदाहरण असल्याचं यानिमित्तानं त्यांच्या नीकटवर्तीयांपैकी अनेकांनी aअभिमानानं नमूद केलं.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!