महाराष्ट्र

Parinay Fuke : दादांनी मिळवून दिले हक्काचे 20 टक्के

Bhandara : भंडाऱ्याच्या मातीतून फुलले समतेचे बोधीवृक्ष 

Share:

Author

भंडाऱ्याच्या राजकारणात आता समतेची क्रांती घडली आहे. भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. या परिवर्तनाचे शिल्पकार ठरले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संदेश दिला. जातीभेद विसरत त्यांनी दुर्बलांचा आवाज बुलंद केला. बाबासाहेबांच्या याच विचारांनी प्रेरित झालेल्या भंडारा जिल्ह्यातील एका नेत्याने इतिहासात पहिल्यांदाच हक्काचे 20 टक्के त्या समाजाला मिळवून दिले आहेत, जे आजपर्यंत भंडारा जिल्ह्यात ना काँग्रेसला जमले ना राष्ट्रवादी काँग्रेसला. अगदी शिवसेनेला देखील ही किमया करता आली नाही.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. संपूर्ण राज्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात संघटनात्मक फेरबदल केले. भारतीय जनता पार्टीकडून 20 टक्क्यांचा कोटा अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव आहे. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेले ‘संविधान वाचवा’ असा नारा दिला, त्या काँग्रेसने जे केले नाही, ते आमदार डॉ. परिणय फुके यांनी करून दाखवले.

नवा इतिहास

भाजपने भंडाऱ्यात आशु गोंडाणे व गोंदियात सीता रहांगडाले यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. यातील आशू गोंडाणे यांची नियुक्ती भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात क्रांतिकारी ठरली. गोंडाणे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. त्यामुळे आमदार फुके यांनी भंडारावासीयांना त्यांच्या हक्काचे 20 टक्के मिळवून दिल्याची ठाम प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.

 

राजकीय इतिहासात प्रथमच भंडाऱ्याला अनुसूचित जमातीचा जिल्हाध्यक्ष मिळाला आहे. आणि त्याची श्रेय भारतीय जनता पार्टीला आहे. अर्थातच यामागे आमदार डॉ. परिणय फुके हे आहेत, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाचा आमदार फुके यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. अनेक निवडणुकीमधून हे वेळोवेळी सिद्धही झाले आहे. या विश्वासाला तडा न देता, आमदार फुके यांनी बाबासाहेबांच्या समतेचा संदेश सार्थकी करून दाखवला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाही या मुद्द्यावर केवळ गप्पा करीत राहिली. पण आमदार डॉ. फुके जिल्ह्याच्या राजकारणात आलेत, त्यांनी परिस्थिती पाहिली, परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यात यशही मिळवले. यातून आमदार फुके हे केवळ विकासाच्या बाबतीत नव्हे तर समतेच्या बाबतीतही अग्रसर ठरले आहेत. ज्या वंचित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी बाबासाहेबांनी आजीवन खस्ता खाल्ला, त्यांनाच आमदार डॉ. परिणय फुके यांनी जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं मानाचं स्थान मिळवून दिला आहे. त्यातून डॉ. परिणय फुके यांनी राजकीय क्षेत्राला मोठा संदेश दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!