महाराष्ट्र

Accident मधील जखमीला उपचार मिळाल्यानंतरच MP पडोळेंमधील डॉक्टर शांत

Prashant Padole यांनी पार पडले आपले कर्तव्य

Share:

Author

अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून जात आजपर्यंत अनेकांनी माणुसकीची जाणीव दाखवून दिली आहे. अशीच माणुसकी भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी दाखवून दिली आहे. 

चोरखमारा गावाचा परिसर. या ठिकाणी बरीच गर्दी जमली होती. रक्ताच्या थारोळ्यात एक माणूस आणि एक महिला रस्त्यावर पडून होते. कोणीही मदतीसाठी पुढे सरसावत नव्हतं. अशातच भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे या भागातून जात होते. गर्दी असल्यामुळे त्यांनी चालकाला वाहन थांबायला सांगितले. चौकशी केल्यानंतर एका दुचाकीस्वराचा अपघात घडल्याचे त्यांना कळले. क्षणाचाही विलंब न लावता प्रशांत पडोळे हे या अपघातग्रस्त लोकांसाठी देवदूतासारखे धावले. रुग्ण किंवा अपघातामध्ये संकटात सापडलेल्या व्यक्तीसाठी डॉक्टर हा दिवस असतो, याची प्रचिती प्रशांत पडोळे यांनी सर्वांना दिली.

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आपला जनसंपर्क मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ते सध्या वेगवेगळ्या भागाचा दौरा करीत आहेत. मतदारसंघातील भेटीगाठीसाठी ते नियमितपणे दौऱ्यावर असताना त्यांना वाटेत हा अपघात दिसला. त्यावेळी त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातातील जखमींना त्यांनी सोबत असलेल्या सहकारी आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना आपल्या वाहनांमध्ये घेतले.

अमित शाह यांच्या विरोधात Vanchit आघाडीचे आंदोलन

Hospital मध्ये पाठपुरावा 

जखमींना सोबत घेतल्यानंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी जवळचे इस्पितळ कोणते आहे याची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना तिरोडा येथील शासकीय रुग्णालय जवळ असल्याचे कळले. जखमींसह स्वतः प्रशांत पडोळे हे तिरोडा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. अपघातातील जखमींसह स्वतः खासदार रुग्णालयात आल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. डॉक्टर, नर्स आणि वार्डबॉय यांची धावाधाव सुरू झाली. डॉक्टरांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले. नर्सेसदेखील सतत रुग्णांची काळजी घेताना दिसत होत्या.

खासदार पडोळे हे स्वतः डॉक्टर असल्याने रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार केले जात आहेत, याचे मॉनिटरिंग तो स्वतः करत होते. दुचाकीवरील दोन्हीही प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे होते. अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना मदत करणाऱ्यांसाठी सरकारने बक्षीसाची योजना सुरू केली आहे. या योजनेतून अपघातामध्ये लोकांचा प्राण जाऊ नये, हा उद्देश आहे. मात्र त्यानंतर अद्यापही अनेक जण अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जात नाही. अनेकदा लोक मदत करायचे सोडून अपघाताचे व्हिडीओ शूटिंग करण्यात बिझी असल्याचे दिसते. मात्र खासदार पडोळे यांनी लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

Reel बाज नाही Real लोकप्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पूरग्रस्त भागाची पाहणी करताना ते कारच्या बोनेटवर बसून पाण्यातून जाताना या व्हिडीओमध्ये दिसत होते. त्यावेळी पडोळे यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र अपघातग्रस्ताला केलेल्या आजच्या मदतीतून खासदार पडोळे यांनी आपण चमकोगिरी करणारे रीलबाज नव्हे तर रियल लोकप्रतिनिधी असल्याची जाणीव सर्वांना करून दिली आहे. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना बक्षीस देण्याची सरकारची योजना आहे. लोकप्रतिनिधी म्हणून खासदार पडोळे यांची जबाबदारी संकटातील लोकांना मदतीची आहे. असे असले तरी सरकारी यंत्रणा त्यांना अपघातग्रस्तांना मदत केली म्हणून बक्षीस जाहीर करण्याच्या मोठेपणा दाखवेल काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!