महाराष्ट्र

Parinay Fuke शब्द टाकणार अन् देवाभाऊ नाही ऐकणार, ‘हो ही नही सकता’

सतत Social Media वरील रीलबाजांना बसणार चाप

Share:

Author

भाजपचे वरिष्ठ नेते आमदार डॉ. परिणय फुके यांचे राजकीय वजन भरपूर आहे. पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शब्द टाकला आहे. लवकरच फडणवीस त्याची दखल घेतील असं दिसत आहे.

Demand To CM : सोशल मीडियावर अनेक रीलबाज सरकारी अधिकाऱ्यांचा सध्या सुळसुळाट आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी सरकारी गणवेश परिधान करून रील तयार करतात किंवा पोस्ट टाकतात. त्यामुळं अशी चमकोगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप लावण्याची आता गरज भासू लागली आहे. सरकारकडून या अधिकाऱ्यांना आता ‘कायदे में रहोगे, तो फायदे में रहोगे’ अशी तंबी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळं यासाठी भंडारा-गोंदियातील भाजपचे ‘हेवीवेट’ नेते आमदार डॉ. परिणय फुके यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. फुके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शब्द टाकला आहे. आतापर्यंत आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रशासनाच्या बाबतीत जी काही मागणी केली ती सर्व देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळं डॉक्टरसाहेब मागणार अन् देवाभाऊ देणार नाही, असं होऊच शकत नसल्याचं बोललं जात आहे.

सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. (Winter Assembly Session at Nagpur) संपूर्ण सरकार नागपूरमध्ये तळ ठोकून आहे. या परिस्थितीत आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे रीलबाज अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची मागणी केली आहे. आमदारांच्या या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. असं झालं तर सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लवकरच नवी नियमावली लागू होईल. या नियमावलीत सोशल मीडियातवर चमकोगिरी करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद असेल.

Bhandara जिल्ह्यात लाव रे तो Scandal व्हिडीओ

Instagram व्हिडीओचा सुळसुळाट

आजच्या युगात इन्स्टाग्रामची सगळ्यात जास्त चलती आहे. तरूणाईकडून या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केला जात आहे. यावर अनेक अधिकारी, कर्मचारी सरकारी Uniform मध्ये व्हिडीओ टाकताना दिसत आहेत. त्यामुळं एखाद्या गाण्यावर सरकारी गणवेशात नृ़त्य करताना किंवा वेडेवाकडे हावभाव करतांना दिसतात. त्यामुळं सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शिस्तीचा भंग होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळं नव्या महायुती सरकारमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झालेल्या आमदार डॉ. परिणय फुके यांनी आता याकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलं आहे.

प्रशासकीय यंत्रणेच्या बाबतीत आतापर्यंत डॉ. फुके यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत. यापूर्वी प्रशासनाकडून सहकार्य न करणाऱ्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांचीही बदलीही डॉ. परिणय फुके यांच्यामुळे झाली आहे. त्याचा फटका भंडाऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांना बसला आहे. त्यामुळं यंदाही डॉ. फुके यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दुर्लक्षित केली जाणार नाही, असं निश्चित मानलं जात आहे. नागपूर शहर पोलिस दलातील एका पोलिस स्टेशनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वर्दीत नृत्यावर ठेका धरला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या सगळ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता डॉ. फुके यांनी यासंदर्भात मागणी केल्यानं सोशल मीडियावर सतत चमकोगिरी करणाऱ्यांचा चाप बसणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!