महाराष्ट्र

Prashant Padole : पहिल्याच पावसात उघडे पडले भंडाऱ्यातील रस्त्यांचे मुखवटे

Bhandara : निकृष्ट दर्जाच्या कामांवर काँग्रेस खासदारांचा रोष

Author

राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भात पहिल्याच पावसाने नागरिकांवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अशातच भंडारा जिल्ह्यात झालेल्या पहिल्या पावसाने रस्त्यांवरील निकृष्ट कामाचा फटका स्पष्टपणे समोर आला आहे.

महाराष्ट्रात पावसाचा आगमन झाल्यावर हवामानात दिलासा मिळाला असला, तरी भंडाऱ्यात मात्र हा पाऊस संकटाचा संदेश घेऊन आला आहे. भंडारा शहरात पहिल्याच पावसातच रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी या समस्येची पाहणी करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. डॉ. पडोळे यांनी शहरातील विविध रस्त्यांवर अचानक भेट देत रस्त्यांची अवस्था पाहिली आणि त्यांच्या नजरेस पडलेली स्थिती म्हणजेच नागरिकांच्या रोजच्या समस्येचे जिवंत चित्र होते.

पडोळे यांनी यास कारणीभूत ठरलेल्या नगर परिषद सीईओ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकार्‍यांच्या कारभारावर रोष व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही केवळ निष्काळजीपणाची गोष्ट नसून हेतुपुरस्सर दुर्लक्षाची ही गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे, नगर परिषद आणि PWD केवळ महिनाभरापूर्वी काही रस्त्यांचे नूतनीकरण केले होते. मात्र पहिल्याच पावसात ते रस्ते उखडले, मोठमोठे खड्डे तयार झाले. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ठेकेदारांचे विशेष संबंध

डॉ. पडोळे यांनी थेट प्रश्न विचारला ‘या दुर्दशेला जबाबदार कोण? भाजप सरकार, नगर परिषदेचे अधिकारी की PWD अधिकारी? शास्त्री चौक ते टाकडी, आंबेडकर वॉर्ड, मेंढा, चांदणी चौक, अशोका हॉटेल परिसर, महात्मा फुले मार्केट, नागपूर नाका आणि राजीव गांधी चौक या सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अनेक रस्त्यांवर काम अपूर्ण आहे. तर काही ठिकाणी विजेचे खांबही अजून काढलेले नाहीत. हनुमान नगर, म्हाडा कॉलनी, रुख्मिणी नगर येथे रस्त्यांची अवस्था तर धक्कादायक आहे. या सर्व स्थितीमागे ज्या ठेकेदारांनी काम केले, त्यांच्या कार्यक्षमतेवरही मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

Abhijit Wanjarri : गडचिरोलीच्या घाणीतून उठला विधानसभेत वंजारींचा वज्रनाद

ठेकेदारांचे विशेष संबंध

डॉ. पडोळे यांनी थेट प्रश्न विचारला ‘या दुर्दशेला जबाबदार कोण? भाजप सरकार, नगर परिषदेचे अधिकारी की PWD अधिकारी? शास्त्री चौक ते टाकडी, आंबेडकर वॉर्ड, मेंढा, चांदणी चौक, अशोका हॉटेल परिसर, महात्मा फुले मार्केट, नागपूर नाका आणि राजीव गांधी चौक या सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अनेक रस्त्यांवर काम अपूर्ण आहे. तर काही ठिकाणी विजेचे खांबही अजून काढलेले नाहीत. हनुमान नगर, म्हाडा कॉलनी, रुख्मिणी नगर येथे रस्त्यांची अवस्था तर धक्कादायक आहे. या सर्व स्थितीमागे ज्या ठेकेदारांनी काम केले, त्यांच्या कार्यक्षमतेवरही मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

भंडारा, तिरोडा आणि गोंदिया या तीनही ठिकाणी हेच ठेकेदार कार्यरत आहेत. त्यांच्या आणि नगर परिषद सीईओ यांच्यातील विशेष संबंधांची चर्चा सध्या शहरभर गाजत आहे. ही फक्त चर्चा नसून निकृष्ट दर्जाचं काम हे या आरोपांना पुष्टी देणारं वास्तव आहे, असंही खासदार पडोळे यांनी ठामपणे नमूद केलं. या रस्त्यांच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी डॉ. पडोळे यांनी भंडारा जिल्हाधिकारी, नगर परिषद सीईओ आणि PWD अधिकार्‍यांशी थेट संपर्क साधला. त्यांनी दोषी कंत्राटदारांवर चौकशी करून कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. रस्ते तातडीने दुरुस्त करा, खड्डे बुजवा आणि जनतेला दिलासा द्या, असा ठणकावलेला संदेश त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!