प्रशासन

ACB Raid : भंडारा जिल्ह्यात लाचखोर हवालदाराचा प्लॅन फेल

Bhandara : घराबाहेर काढण्यासाठी वीस हजारांची डील

Share:

Author

भंडारा जिल्ह्यात पोलीस ठाण्यातील हवालदाराने घराच्या ताब्याकरिता लाच मागितल्याच्या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून कारवाई केली.

सरकारी काम आणि चार पैसे ओढायचे स्वप्न, पण अँटी करप्शन ब्युरोने (ACB) या स्वप्नावर जोरदार घाव घातला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेश नीलकंठ गभने यांना लाच मागणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या एका 52 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई उभी राहिली आहे. तक्रारदाराने 2018 वर्षी भंडाऱ्यातील लाखनी येथे एक घर विकत घेतले होते. नुकतीच त्यांनी पाहणी केल्यावर आढळले की, एक महिला आणि तिचा मुलगा यांनी त्यांचे घर बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले आहे.

तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाखनी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध 18 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणात सहकार्य करायचे म्हणून पोलीस हवालदार गभने यांनी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर पाच हजार रुपयांचा पहिला हफ्ता मागण्यात आला. तक्रारीनंतर लगेचच 23 एप्रिल रोजी अँटी करप्शन ब्युरोने पडताळणी केली. यामध्ये गभने यांनी पाच हजार रुपये लाच स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर दिनांक 27 एप्रिल आणि 14 मे रोजी सापळा कारवाईचे नियोजन करण्यात आले.

Amol Mitkari : माफी मागणार तरंच एकत्र येणार

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पुढाकार

गभने यांना संशय आल्यामुळे त्यांनी प्रत्यक्षात लाच स्वीकारली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. घटनास्थळ होते इंडियन ऑईलचा डोंगरवार पेट्रोल पंप, लाखनी येथे. आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली असून, त्यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. मोबाईलमधून अधिक तपशील मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई डॉ. अरुणकुमार लोहार (पोलीस उप अधीक्षक, भंडारा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाईत निरीक्षक, सहायक पोलीस हवालदार आणि अन्य अधिकारी यांनी सहभाग घेतला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) तडाखेबंद योजनेने या भ्रष्टाचाराच्या प्रकाराला वेळीच आळा घातला आहे. गभने यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणजेच भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे या प्रकरणात सक्षम अधिकारी म्हणून पुढील कारवाई करीत आहेत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाच घेण्याच्या प्रयत्नात असलेला अधिकारी अखेर अटक करण्यात यश मिळाले आहे. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना अँटी करप्शन ब्युरोने स्पष्ट संदेश दिला आहे. कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने, अगदी एजंटमार्फतही लाचेची मागणी केली, तर तात्काळ ACB कार्यालयाशी संपर्क साधा. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल, आणि कारवाई निश्चितच होईल.

Anil Deshmukh : एकत्रीकरणाचा भपका; जवळ या, कानात सांगतो…

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!