महाराष्ट्र

Parinay Fuke : भंडारा-गोंदियात भाजपचे नवे शिलेदार सज्ज

BJP : नव्या चेहऱ्यांना मिळाले मंडळ अध्यक्षपदाची सूत्र

Author

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक फेरबदल करत नव्या मंडळ अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करत पक्ष विस्ताराचा नवा अध्याय सुरू केला आहे. राज्यभरात भाजपमध्ये नव्या जोमात संघटनात्मक फेरबदल सुरू आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विदर्भातील या दोन जिल्ह्यांवरही दिसून येतोय. अलीकडेच या भागात विविध मंडळांवर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आणि स्थानिक प्रभावशाली चेहऱ्यांना या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. लवकरच जिल्हाध्यक्षांचीही निवड होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नव्याने निवडले गेलेले बहुतेक मंडळ अध्यक्ष हे माजी पालकमंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके यांचे चाहते आहेत.

भाजपच्या नव्या मंडळाध्यक्ष नियुक्तीमुळे गोंदिया आणि भंडाऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचे या भागातील राजकारणात प्रभावी स्थान आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा संघटनेला गती देण्याची तयारी केली आहे. हे नेतृत्व संपूर्ण जिल्ह्यात पक्षाची विचारसरणी पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. नव्या नियुक्त्यांमुळे केवळ संघटन बळकट होणार नाही, तर लोकांच्या प्रश्नांवर अधिक परिणामकारकपणे काम करता येणार आहे.

Parinay Fuke : विकासाच्या प्रवाहात गोवारी समाजाची एन्ट्री

विदर्भात नव्या नियुक्त्या

गोंदिया विधानसभा मतदारसंघात गोंदिया शहर बाजार भागासाठी विवेक मिश्रा, ऋषिकांत शहू, कुडवा मुकेश लिल्हारे, संदीप तूरकर, ललित तावाडे यांना नियुक्त करण्यात आले आहे. तिरोडा विधानसभा मतदारसंघात गोरेगावचे प्रतिनिधित्व अनंता ठाकरे करतील, तर तिरोडा शहरासाठी नितीन पराते, संतोष चौधरी, रविंद्र वहिले आणि प्रमोद पटले यांची नियुक्ती झाली आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात अर्जुनी मोरगावचे नेतृत्व राधेश्याम भेंडारकर, राजेश कठाणे आणि विलास बागडकर यांच्याकडे सोपवले गेले आहे. तर आमगाव विधानसभा मतदारसंघात देवाराम चुटे, मनोज सोमवंशी आणि संजय उईके यांची नियुक्ती झाली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे भाजपच्या संघटनात्मक पातळीला नवसंजीवनी मिळेल, अशी पक्षात अपेक्षा आहे.

भाजपच्या या नव्या संघटनात्मक पावलांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. पक्षाचा मूलमंत्र सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास अंगीकारून हे सर्व मंडळाध्यक्ष आता जनतेच्या मुद्द्यांवर अधिक सजगपणे काम करतील, अशी अपेक्षा आहे. सर्व नव-नियुक्त मंडळ अध्यक्षांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील भाजपचे बळ आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Bhandara : मंडोवीच्या वाळूतून उघड झालं तस्करीचं काळं सोनं 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!