महाराष्ट्र

Akola BJP : आमदार पठाण फक्त चमकतात, पण वीज आणत नाहीत 

Electricity Issue : साजिद खान पठाण यांची चमकोगिरी आणि फोटोशूट 

Share:

Author

अकोल्यातील वीज खोळंब्याने जनतेचा संताप उफाळला असताना, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची ‘चमकोगिरी’ चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने त्यांच्यावर लोकांच्या नजरेत येण्यासाठी केलेले ‘फ्लॅश आंदोलन’ म्हणत टीका केली आहे. 

आमदार साजिद खान पठाण येतात, फोटो काढतात, चमकतात आणि नंतर गायब होतात. पण अकोल्यातला अंधार मात्र काही कमी होत नाही, असाच संतप्त सूर सध्या अकोल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत ऐकायला मिळतो आहे. वीज खोळंबा या जळत्या मुद्द्यावरून आता अकोल्यात राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे.

अकोल्यातील जुने शहर व परिसरातील नागरिक अक्षरशः वीज नसलेल्या रात्री झगडत आहेत आणि त्याच वेळी या अंधारातही काही नेते ‘प्रकाशझोतात’ राहण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपकडून सुरू आहे. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी नुकतीच महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांची बैठक घेतली, आदेश दिले, आणि बातम्यांत ठसा उमटवला. मात्र, भाजपकडून यावर स्पष्ट शब्दांत घणाघात होत आहे – ही धडक नव्हे, ही तर एक ‘फ्लॅश’ होती – मीडिया फ्लॅश.

जबरदस्त हल्लाबोल

भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून साजिद खान पठाण यांच्यावर टीकेचा जोरदार मारा केला जातो आहे. जेव्हा जनतेचा संयम सुटतो, तेव्हा पठाण साहेब दाखवतात की, मी जागा आहे. पण एकदा मीडिया गेली, की तेही गायब, असा सरळ घणाघात भाजपकडून पठाण यांच्यावर करण्यात येत आहे. वीजखोळंब्याचा विषय यंदा इतका गंभीर झाला आहे की, अकोल्यात थोडासा पाऊस पडला की लाईट गायब आणि ती येते केव्हा, याचं कोणालाच ठोस उत्तर नसतं. पण या प्रश्नावर आमदार पठाण यांनी केवळ एकदा धडक दिली आणि पुन्हा शांत बसल्याने भाजपने त्यांचा ‘फोटोशूट’वरच विश्वास असल्याचा आरोप लावला आहे.

उपरोधिक टीका

भाजपच्या मते, साजिद खान पठाण यांचे विद्युत भवनावरील आंदोलन केवळ ‘ड्रामेबाजी’ होती. महावितरणच्या अधिकाऱ्यांना दम दिला खरा, पण पुढे काय? ना पाठपुरावा, ना दुसरी बैठक, ना रिझल्ट. केवळ कॅमेऱ्यासमोरची चमक, असा टोकाचा आरोप भाजपने केला. साजिद खान पठाण यांच्या चमकोगिरीच्या आरोपांत आणखी एक भर म्हणजे डाबकी रोडच्या रुंदीकरणातील त्यांची ‘दखल’. भाजपने स्पष्टपणे सांगितले की, हे काम त्यांच्याच सत्ताकाळात मंजूर झाले होते. मात्र, पठाण यांनी तेथील फोटोशूट करून ‘क्रेडिट खेचण्याचा’ प्रयत्न केला.

भाजपकडून आता साजिद पठाण यांना सरळ शब्दांत आव्हान दिलं जात आहे. वास्तविक वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय केलं? आता या खोळंब्याची समस्या सुटेल का? जनतेला उत्तर द्या. आता आमदार पठाण यांनी विजेचे समस्या सोडूनच दाखवावी, हा आमचा चॅलेंज आहे, असे भाजपकडून बोलले जात आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!