महाराष्ट्र

भाजप उमेदवाराची Sajid Khan Pathan यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

Vijay Agrawal यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी

Author

अकोला पश्चिम विधासभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची झाली होती. आता हा मुद्दा नागपूर उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

राज्य विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुती सत्तेवर आली. परंतु भाजपचा गड असलेला अकोला पश्चिम मतदारसंघ नेमका भाजपाच्या हातातून निसटला. अकोल्यात भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांनी पराभव केला. त्यानंतर आता विजय अग्रवाल यांनी साजिद खान पठाण यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

अकोला पश्चिम मतदारसंघात 34 हजार 400 मतदारांची नावे बनावट असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानंतरही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित केला आहे. अकोल्यातील या अवैध मतदारामुळे साजिद खान पठान निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Congress पडली होती भारी

भाजप आणि काँग्रेसमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघात अटीतटीचा सामना झाला होता. यात काँग्रेस उमेदवार साजीद खान पठान यांनी अवघ्या एक हजार 283 मतांनी भाजपचे उमेदवार यांचा विजय अग्रवाल यांचा पराभव केला. साजीद खान यांना 88 हजार 718 तर विजय अग्रवाल यांना 87 हजार 435 मते प्राप्त झाली होती.

मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वी अकोला पश्चिम मतदार संघासाठी मतदारयादी तयार करण्यात आली होती. या मतदार यादीत विजय अग्रवाल यांनी तब्बल 34 हजार 400 मतदारांच्या नावांची वेगवेगळ्या ठिकाणी नोंद असल्याचा आक्षेप घेतला होता. ही नावे बाद करण्याची मागणी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्याकडे केली होती. यासंदर्भात प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा मुद्दा विजय अग्रवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेत उपस्थित केला आहे.

अकोला मतदारसंघात 3 हजार 600 आणि बाळापूर मतदारसंघात एक हजार 100 मतदारांची नावे एकसारखी आढळली होती. इतकेच नव्हे तर त्यांचे छायाचित्रही एक सारखेच होते. अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांच्या नावांची यादी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाकडे सादर केली होती, असा दावा देखील विजय अग्रवाल यांनी केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!