महाराष्ट्र

Pravin Datke : ये पब्लिक है, सब जानती है 

Nagpur : सद्भावना यात्रा नाही तर, मगरीचे अश्रू 

Author

नागपूरमध्ये काँग्रेसकडून काढण्यात आलेली सद्भावना रॅली आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही रॅली म्हणजे ‘मगरमच्छ के आसू’ असल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दटके यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

नागपुरात काँग्रेसकडून काढण्यात आलेली सद्भावना रॅली चर्चेचा विषय ठरली आहे. शहरात शांतता, ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी काँग्रेसकडून ही रॅली काढण्यात आली. परंतु, या रॅलीवर आता राजकारणाचे वादळ उठले आहे. भाजपचे नेते आमदार प्रवीण दटके यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत ही रॅली म्हणजे ‘मगरमच्छ के आसू’ असल्याची जहाल प्रतिक्रिया दिली आहे.

दटके यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट शब्दांत काँग्रेसवर आरोप करत म्हटले की, ज्या वेळी नागपूर शहर दंगलीच्या आगीत होरपळत होतं, त्या वेळी काँग्रेसचा एकही नेता मदतीसाठी पुढे आला नाही. परंतु आज, घटना घडून तब्बल एक महिना उलटल्यानंतर काँग्रेसला अचानक सद्भावनेची जाणीव झाली आहे. ही रॅली म्हणजे केवळ राजकीय पोळी भाजण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे.

खोटेपणाचा मुखवटा 

प्रविण दटके यांचे म्हणणे आहे की, औरंगजेबाच्या कबरीविरोधातील आंदोलनाचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी नागपूरमधील तरुणांच्या भावना भडकवल्या. या भडकावलेल्या भावना हिंसाचारात परिवर्तित झाल्या आणि नागपूरसारख्या शांत शहरात अशांततेची ठिणगी पडली. या दंगलीत सामान्य नागरीकांचे वाहन, दुकाने, घरे यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या सर्वामध्ये ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यांच्यासाठी काँग्रेसने एक शब्ददेखील बोललेला नाही. त्यांच्या व्यथेला कोणी आवाज दिला नाही, असा घणाघात दटके यांनी काँग्रेसवर केला.

Amravati Airport : राणांची आघाडी वानखडे बॅक बेंचवर

झोपेतून उठल्यासारखे काँग्रेस नेते आता सद्भावनेची रॅली काढतात. कोटींचे नुकसान झालेल्या नागरिकांच्या वेदना 500 पावले चालून समजणार आहेत का? असा थेट सवालही दटके यांनी केला. काँग्रेसला आता जाणीव झाली की काहीतरी करायला हवे, पण जनता मूर्ख नाही, तिला नेमकं कळतं की कोण खरं आणि कोण फक्त नाटक करतंय, असे ते म्हणाले.

दंगलखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर

प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या कारभाराचे कौतुक करत म्हटले, सरकारने ठाम भूमिका घेत, या दंगेखोरांवर बुलडोझर चालवला आहे. आता त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जात आहे. हीच कायद्याची खरी अंमलबजावणी आहे. शेवटी, दटके यांनी काँग्रेसवर अंतिम टोला लगावत म्हटलं, ‘जनता सब जानती है’. कोण वेळेवर मदतीला धावलं, आणि कोण राजकीय संधी शोधत बसलं, हे नागपूरकरांना चांगलंच उमगलं आहे.

ही संपूर्ण घडामोड नागपूरच्या राजकारणात नवा रंग भरतेय, हे नक्की. सद्भावनेच्या नावाखाली राजकारणाचा डाव, आणि त्यावर भाजपची धडक प्रतिक्रिया. आगामी निवडणुकांवर याचा नक्कीच प्रभाव दिसून येईल, असा अंदाज लावण्यात येत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!