महाराष्ट्र

पक्षादेशावर सोडलं Zilla Parishad मधील पदावर पाणी

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत Bhandara मध्ये वेगवान घडामोडी

Post View : 20

Author

भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विनोद बांते यांनी पक्षादेश मानत मोठ्या पदावर पाणी सोडलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं ते भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीकडे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी भंडाऱ्यात निवडणूक झाली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता उईके यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकनाथ फेंडर यांची वर्णी लागली. या निवडणुकीसाठी भाजप नेते विनोद बांते यांना त्यागाची भूमिका घ्यावी लागली. उपाध्यक्ष पदासाठी त्यांचं नावही चर्चेत होतं. काँग्रेसनं आपली खेळी खेळत भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसचा हा मनसुबा यशस्वी झाला नाही.

कविता उईके या काँग्रेसमधून भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. परंतु त्या मूळच्या काँग्रेसी आहेत. काही वर्षांपूर्वी नाना पटोले हे देखील भाजपमध्ये आले होते. परंतु त्यांनी अचानक पलटी मारली. पटोले पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. आता ते भाजपच्या विरोधात प्रचंड आक्रमकपणे बोलू लागले आहेत. कदाचित काँग्रेस नेत्यांच्या याच कार्यपद्धतीमुळं उईके यांना पक्ष प्रवेश नाकारण्यात आला असावा असं आता जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. उईके भाजपमध्ये आल्या असत्या. अध्यक्ष झाल्या असत्या. त्यानंतर त्या पुन्हा काँग्रेसकडं वळल्या नसल्या याची कोणतीही खात्री नव्हती असं सांगितलं जात आहे.

प्रकृती अस्वस्थ, पण नेतृत्व अबाधित; Sharad Pawar यांच्याबद्दल चिंता

महायुतीचा धर्म पाळला

जिल्हा परिषद अध्यक्षपद काँग्रेसकडं गेल्यानंतर उपाध्यक्ष पदावर भाजप दावा करू शकली असती. परंतु भाजपकडून महायुतीचा धर्म पाळण्यात आला. उपाध्यक्ष पदासाठी विनोद बांते, एकनाथ फेंडर, देवा इलमे यांचं नाव चर्चेत होतं. परंतु भाजपनं उपाध्यक्ष पद ठरल्याप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं ठरविलं. त्यामुळं विनोद बांते यांना पदाचा त्याग करावा लागणार होता.यासंदर्भात भापजच्या वरिष्ठ नेत्यांनी बांते यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता उपाध्यक्ष पदाचा विचार बाजूला केला. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ फेंडर हे उपाध्यक्ष झालेत. परिणामी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काँग्रेसचं षडयंत्र अपयशी ठरलं आहे.

भंडारा जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद जरी काँग्रेसनं मिळविलं. पण काँग्रेसची भंडारा जिल्ह्यातील वाट आता खडतर होत जाणार आहे. राज्यात महायुतीचं सरकार आहे. महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर वाद निर्माण झाले आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. यात शिवसेना स्वबळाची तयारी करीत आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. पण आता विरोधी पक्षनेते पद मिळविण्यापुरते संख्याबळही काँग्रेसकडे नाही. पटोले यांचं प्रदेशाध्यक्षपद कोणत्याही क्षणी जाऊ शकते. अनेकांच्या त्यांच्या खुर्चीखाली भूसुरूंग पेरून ठेवले आहेत. त्यामुळं पटोले यांचं पद गेलं तर भंडारा झेडपीत काँग्रेसचं काय होणार, हा प्रश्न अनेकांना आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!