महाराष्ट्र

Bhandara : भाजप कार्यकर्त्यांनी कमळ सोडून काँग्रेसचा पकडला हात

Congress : नानांनी पुन्हा गाठला पक्षाचा विश्वास

Post View : 47

Author

भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतर्गत फेरबदल ही एक जुनीच परंपरा आहे. मात्र गेल्या काही दिवसांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश केल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले होते. यामध्ये विशेषतः काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याचे दिसून येत होते. मात्र, आता भंडारा जिल्ह्यातील काही भाजप कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपच्या या पक्षांतर्गत बदलानंतर भाजपच्या विरोधातील वातावरण अधिकच गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील निलज येथील भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उपसरपंच परमानंद गहाणे, तसेच सुरेश गहाणे, सुधाकर गहाणे, पतिराम गहाणे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीरपणे प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांच्या AI आवाजावरून रणसंग्राम 

लोकशाहीचे व्यासपीठ

देशहित, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी काँग्रेस हा योग्य व्यासपीठ असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात राज्य मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, वजाहत भाई मिर्झा उपस्थित होते. भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, शिशुपाल पटले, अनिल बावनकर यांच्यासह काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नाना पटोले यांच्या नेतृत्वावरही सध्या चर्चा सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्यावर आपल्याच पक्षातील काही कार्यकर्त्यांनी टीका केली होती. यावर काही कार्यकर्त्यांनी आरोप केला की, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणूक हरली. त्यांनी काँग्रेसला एक नवीन दिशा दिली नाही. यामुळे नानांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची सोडावी लागली होती. मात्र आता नाना पटोले हळूहळू आपले विश्वास पुन्हा मिळवत आहेत असा अंदाज काही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Buldhana : मादक पदार्थांची खुलेआम तस्करी; पोलीस मात्र झोपेत

भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा त्यांचा विश्वास पुन्हा स्थापित करण्याचा एक भाग मानला जात आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याचा भविष्यात काँग्रेसला किती फायदा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!