महाराष्ट्र

विकासासाठीही Vasant Khandelwal यांनी करावी उत्कृष्ट फलंदाजी

प्रगतीसाठी Akola जिल्ह्यातील नागरिकांची आमदारांकडे अपेक्षा

Post View : 18

Author

अकोल्यातील क्रिकेट स्पर्धेत ज्याप्रकारे आमदार वसंत खंडेलवाल यांनी स्पर्धेत फलंदाजी केली. त्याचप्रमाणे अकोल्याच्या विकासासाठी ही त्यांनी दमदार फलंदाजी करावी, अशी अकोला वासियांची अपेक्षा.

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित ‘इंटर प्रोफेशन लीग’ क्रिकेट स्पर्धेत अकोल्याचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी आपल्या दमदार फलंदाजीने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. ही स्पर्धा शहरातील चार प्रमुख व्यवसायिक गट म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट (CA), वकील, डॉक्टर आणि आर्किटेक्ट. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत स्थानिक राजकारण्यांनी देखील सहभाग घेतला असून, आमदार वसंत खंडेलवाल यांचा खेळ विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

अद्भुत फलंदाजी करणारे खंडेलवाल यांनी राजकीय खेळपट्टीवरही अकोल्याच्या विकासासाठी अशाच जोरदार ‘फटकेबाजी’ करण्याची गरज आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अकोल्याच्या विकासाला गती देण्याचे जबाबदारी वसंत खंडेलवाल यांच्यावर आहे. त्यांचा नेतृत्वगुण आणि तांत्रिक कौशल्य पाहता, शहराच्या मोठ्या प्रश्नांची उकल करण्याची अपेक्षा स्थानिक जनतेला आहे. विशेषतः अकोला विमानतळाचा प्रश्न गेले अनेक वर्षे रखडलेला आहे. या मुद्यावर सकारात्मक तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

वीज चोरी रोखण्यासाठी Prepaid Meter; विरोधाचा जोर वाढला

विकास महत्त्वाचा

अकोल्याचे विमानतळ विकसित करण्याच्या हालचाली अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून (PKV) अपेक्षित असलेले जमीन हस्तांतरण अद्याप झालेले नाही. यामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाला विलंब होत आहे. शहराच्या भविष्यासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी विमानतळाचा विकास अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे खंडेलवाल यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

राजकीय कारकीर्दीबरोबरच खंडेलवाल यांचा शिक्षण आणि तांत्रिक पार्श्वभूमी अत्यंत मजबूत आहे. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा होल्डर आहेत. त्यामुळे शहराच्या विकास प्रक्रियेत त्यांचे तांत्रिक ज्ञान मोठी भूमिका बजावू शकते. अकोल्यातील विविध समस्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून तोडगा काढण्याची त्यांची क्षमता आहे.

गडकरींचे निकटवर्तीय

वसंत खंडेलवाल हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रभावामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ अकोल्याला मिळू शकतो. विशेषतः रस्ते विकास, स्मार्ट सिटी प्रकल्प, उद्योगधंद्यांची वाढ आणि इतर नागरी सुविधा यामध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

अकोल्याला योग्य दिशा देण्यासाठी शहराच्या पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा, वाहतूक, आरोग्य सेवा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावी लागणार आहेत. स्थानिक नागरिकांचीही अपेक्षा आहे की, आमदार खंडेलवाल यांनी मैदानावर जशी उत्कृष्ट फटकेबाजी केली. तशीच विकासाच्या खेळपट्टीवरही दमदार इनिंग खेळावी.

नागरिकांकडून मोठ्या अपेक्षा

अकोल्याच्या जनतेला आपल्या आमदारांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत आघाडीवर राहून समस्या सोडवण्याची जबाबदारी वसंत खंडेलवाल यांच्यावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोल्याचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, अशी नागरिकांना आशा आहे.

आमदार वसंत खंडेलवाल यांची क्रिकेटमधील खेळी जशी दमदार होती. तशीच दमदार कामगिरी त्यांनी विधिमंडळात आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीनेही करावी, हीच अकोल्याच्या जनतेची प्रामाणिक इच्छा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!