महाराष्ट्र

Prainay Fuke : ‘एलएक्यु’चा धाक दाखवत नेत्यांच्या एजन्ट्सकडून खंडणी वसुली

Gadchiroli Rice Scam : माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांना दिले ‘पेन ड्राइव्ह’ पुरावे

Author

भाजपचे विधान परिषद सदस्य माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी गडचिरोली जिल्ह्यात विरोधी नेत्यांच्या एजन्ट्सकडून होत असलेल्या मोठ्या खंडणी वसुली रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बड्या नेत्यांच्या काही एजन्ट्सकडून राइस मिल मालकांना पैसे द्या नाही तर ‘एलएक्यु’लावतो, अशा आशयाच्या धमक्या मिळत असल्याचा दावा डॉ. फुके यांनी केला आहे.

पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात धान भरडाई करण्यात येते. याची कामं राइस मिलला देण्यात येते. यापैकी काही मिलर्सविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. या मिलर्सकडून काही विरोधी पक्षातील काही बड्या नेत्यांचे एजन्ट्स वसुली करीत आहेत. पैसा द्या अन्यथा विधिमंडळात ‘एलएक्यु’ लावला जाईल, अशी धमकी या मिलर्सला देण्यात येत असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला. विधान परिषदेत यासंदर्भात डॉ. फुके यांनी लक्षवेधी मांडल्यांनंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

घोटाळ्यामध्ये काही राइस मिलर्सची नावे होते. याच मुद्द्यावर विधिमंडळात 11 मार्चला एक ‘एलएक्यु’ विधान सभेत मांडण्यात आला. विधानसभेतील या ‘एलएक्यु’च्या संदर्भात काही नेत्यांचे एजन्ट्स संबंधित राइस मिलधारकांकडे गेले. एजन्ट्सनी काही राइस मिलधारकांना फोनही केला. काहींनी मिलर्सच्या कार्यालयात जात त्यांना धमकावलेही. मिलधारकांकडून या एजन्ट्सनी थेट पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास ‘एलएक्यु’ करण्यात येईल, असेही मिल मालकांना धमकावण्यात आल्याचा थेट आरोपच डॉ. परिणय फुके यांनी केला.

Parinay Fuke : एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा विधानपरिषदेत गाजवणारा विदर्भाचा आमदार

पुरावे मुख्यमंत्र्यांकडे

आमदार डॉ. फुके यांनी लक्षवेधी मांडताना या एजन्ट्सच्या संभाषणाचे ऑडियो, व्हिडीओ रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर विधान परिषदेत मोठा राजकीय भूकंप आला. आपल्याकडे असलेले सर्व पुरावे आपण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचेही डॉ. फुके यांनी सभागृहात सांगितले. आपण संबंधितांची नावं घेतली तर समोरच्या बाकांवरील अनेक जण उडतील असंही आमदार डॉ. फुके म्हणाले. त्यामुळं विरोधकांना चांगलाच घाम फुटला. त्यांनी डॉ. फुके यांची लक्षवेधी सुरू असताना व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याकडे ठोस पुरावेच आहेत. हे सर्व पुरावे आपण मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.

आपल्याकडे जमा झालेल्या सर्व पुराव्यांची ‘फॉरेन्सिक’ तपासणी झाली की, ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल, असा इशाराही डॉ. फुके यांनी संबंधितांना दिला. त्यामुळे गडचिरोलीतील राइस मिल मालकांकडून वसुलीसाठी एजन्ट सक्रिय करणारे ‘ते’ नेते कोण? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. राइल मिल मालकांकडे कोण गेले, केव्हा गेले, काय संवाद झाला याच्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप पुरेशा आहेत. त्यांची तपासणी झाल्यानंतर एजन्ट्सचे खरे ‘आका’ समोर येतील, असं आमदार डॉ. परिणय फुके यांनी लक्षवेधीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.

आपण यासंदर्भातील तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सभागृहातही लक्षवेधी मांडली आहे. त्यामुळे ‘एलएक्यु’चा धाक दाखवून वसुली करणाऱ्या नेत्यांच्या एजन्ट्सविरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली. डॉ. फुके यांनी टाकलेल्या या पेन ड्राइव्ह बॉम्बमुळे आता विधिमंडळात खळबळ उडाली आहे. ‘एलएक्यु’चा धाक दाखवून पैशांची वसुली करणारे एजन्ट आणि त्यांच्या पाठीमागील बडे नेते कोण? यासंदर्भात चर्चेला सुरुवात झाला आहे.

अनेकांची अडचण

गडचिरोलीतून होत असलेल्या या वसुलीचा डॉ. परिणय फुके यांनी पर्दाफाश केल्यामुळे पूर्व विदर्भातील धान घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डॉ. फुके यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर तपास झाल्यास, रग्गड पैसा कमाविण्यासाठी विधिमंडळाच्या बाकांचा गैरवापर करणारे नेते आणि त्यांचे कलेक्शन एजन्ट्स अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादा विषय लावून धरल्यानंतर त्याचा ‘एन्ड रिझल्ट’ येईपर्यंत पाठपुरावा करणारे आमदार म्हणून डॉ. परिणय फुके यांची ख्याती आहे. अशात त्यांनी सुरू केलेल्या ‘एलएक्यु एक्सटॉर्शन’ घोटाळ्याच्या अध्यायातील पानांवर कोणकोणाची नावं आरोपीच्या यादीत येतील, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!