महाराष्ट्र

Parinay Fuke : जिल्हा मजूर संघावर संघर्ष पॅनलचं वर्चस्व

BJP Panel Wins : विरोधकांचा धुव्वा उडविण्यात आमदार डॉ. परिणय फुके यांना यश

Author

पूर्व विदर्भात भाजपची पाळंमुळं खोलवर रूजविण्यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांना यश मिळालं आहे. जिल्हा मजूर संघाच्या निवडणुकीत भाजपप्रणित संघर्ष पॅनलनं विजय मिळविला आहे.

नागपूर जिल्हा मजूर सहकारी संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपप्रणित संघर्ष पॅनलनं दणदणीत विजय मिळविला आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात या पॅनलनं विरोधकांना धूळ चारली. आगळीवेगळी राजकीय व्यूहरचना करीत डॉ. फुके यांनी मजूर संघावर भाजपचा झेंडा फडकाविला आहे. नागपूर जिल्हा मजूर सहकारी संघाची ही निवडणूक रविवारी, (ता. 23) पार पडली. या निवडणुकीत विजय मिळावा, यासाठी डॉ. परिणय फुके यांनी कंबर कसली होती. निवडणुकीत संघर्ष पॅनलचे 15 संचालक विजयी झालेत.

नागपूर जिल्हा मजूर सहकारी संघाची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली तो. यंदाच्या निवडणुकीत संघर्ष पॅनलचे हर्षद चंद्रकांत जामकर, सुभाष यादवराव ढबाले, दिलीप धोंडबाजी पाटणे हे रिंगणात होते. अमनसिंग धरमपालसिंग भामरा, गुणवंत धनराज रंगारी, अरुण शंकरराव राऊळ यांनी देखील निवडणूक लढविली. रमेश दशरथ ढोक, दामोधर रामचंद्र दियेवार, मारोती विठोबाजी गडमडे, भाऊराव काशीनाथ भैसारे यांनीही आपले भाग्य अजमावले. अनिता हरिहरेश्वर भकने, सोनल पंकज रावेरकर, प्रेमकुमार हरिदासजी ढोणे, कृष्णा नारायण बेले, मनोज कृष्णराव पटमासे हे देखील रिंगणात होते. या सर्वांना निवडणुकीत विजय मिळाला.

Manikrao Kokate : जास्त मस्ती कराल तर घरी जाल

वर्चस्व कायम

पूर्व विदर्भातील राजकारणात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचं वर्चस्व आहे. दोन्ही जिल्ह्यात भाजपला मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला या दोन्ही जिल्ह्यात मोठं यश मिळालं. महायुतीच्या नेत्यांना सोबत घेत डॉ. परिणय फुके यांनी भाजपला दोन्ही जिल्ह्यात मोठं स्थान मिळवून दिलं. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपचं प्राबल्य आता वाढलं आहे. त्याचं श्रेय देखील आमदार डॉ. फुके यांनाच आहे.

नागपूर जिल्हा मजूर संघाच्या संघर्ष पॅनलला देखील आमदार डॉ. परिणय फुकं यांचं मार्गदर्शन लाभलं. आमदार डॉ. फुके यांनी निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्याबाबत पॅनलच्या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन केलं. संघाच्या सर्व संचालकांनी डॉ. फुके यांच्यावर विश्वास ठेवत निवडणूक लढविली. त्यामुळंच त्यांना विरोधी पॅनलचा धुव्वा उडवता आला. विरोधी पॅनलचा एकही संचालक निवडणुकीत विजयी होऊ शकला नाही. निवडणुकीतील विजयानंतर आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. लोकशाहीला विजयी करणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनापासून आभारही मानले. संघातील सभासदांचा विश्वास संघर्ष पॅनल सार्थकी ठरवेल असं यावेळी आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!