महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसने घेतली मोठी भरारी

Brahmapuri Congress : विजय वडेट्टीवारांनी फोडले भाजप राष्ट्रवादीचे नेते

Author

ब्रहमपुरी विधानसभा क्षेत्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. राजकीय घडामोडींना आता अधिक वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोग सक्रिय झाला असून सर्वच पक्षांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, या निवडणूक काळात पक्षांतरांची मालिका सुद्धा थांबण्याचे नाव घेत नाहीये. महाविकास आघाडीतील काही नेते सातत्याने इतर पक्षांत सामील होत असल्याने आघाडीला मोठे धक्के बसत आहेत. या पार्श्वभूमीवर, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात मात्र एक वेगळीच हवा पाहायला मिळत आहे.

काँग्रेस पक्षात विरोधी पक्षांतील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामील झाल्याने पक्षाच्या गोटात नवचैतन्य संचारले आहे. भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह इतर छोट्या पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. हा सोहळा काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संविधानाच्या मूल्यांसाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी हे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी सर्व नव्याने दाखल झालेल्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Amol Mitkari : नागपंचमी संपली खरी, पण आयत्या बिळावर नागोबा डोलतोच

स्थानिक नेतृत्वाचा सहभाग

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विविध विकासकामांसाठी त्यांनी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत कोट्यवधींचा निधी खेचून आणल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांसाठी न्याय, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि मूलभूत गरजांची पूर्तता हेच आपले ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रेरणेतूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, शहराध्यक्ष पराग बनपुरकर तसेच विविध गावांतील उपसरपंच आणि बाजार समिती संचालकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुधीर पिलारे, कोमल टेंभुर्णे, केशव भुते, हिवराज पारधी, अतुल तोडासे, रतन सोंदरकर, अनिकेत देशमुख, ओमप्रकाश खुळशिंगे यांच्यासारख्या अनेक प्रमुख स्थानिक नेतेही या प्रवेशाचे भाग बनले.

पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेसचे ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे, तसेच अन्य अनेक पदाधिकारी उपस्थित होते. चौगान येथील भाजप कार्यकर्ते पुरुषोत्तम, संजय, दीपक आणि नंदकिशोर नन्नावरे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा विशेष लक्षवेधी ठरला. या घडामोडींमुळे ब्रह्मपुरीत काँग्रेसचे स्थान अधिक भक्कम झाले असून आगामी स्थानिक निवडणुकीमध्ये हा बदल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. पक्षाला मिळणारे नवीन बळ, स्थानिक नेतृत्वाचे मजबूत योगदान आणि मतदारसंघातील विकासकामांची पारदर्शक यादी हे सर्व काँग्रेससाठी सकारात्मक संकेत आहेत.

Chandrashekhar Bawankule : 2029 पर्यंत महाराष्ट्र महसूल विभाग ठरेल अग्रेसर 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!