महाराष्ट्र

Gadchiroli : चकमकीच्या अग्नीत नक्षलांचे मनसुबे भस्मसात

Naxalwadi : गडचिरोलीत सी-60 कमांडोजचा मोठा पराक्रम

Author

गडचिरोली जिल्ह्यात सीमेवरील नक्षलविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कवंडे परिसरात माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत शस्त्रसाठ्याची मोठी जप्ती करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील सुरक्षा यंत्रणांनी पुन्हा एकदा आपली धमक दाखवली आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलीस ठाण्याजवळ माओवादी भामरागड दलमकडून उभारण्यात आलेल्या गुप्त तळाचा शोध घेऊन गडचिरोली पोलिसांनी तो उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांच्या योजनांना मोठा धक्का बसला असून परिसरात माओवाद्यांची कोंडी करण्यात यश आले आहे.

10 मे रोजी माओवाद्यांनी कवंडे परिसरात नवा तळ उभारल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 कमांडोंच्या 200 जवानांचे विशेष अभियान तातडीने राबवण्यात आले. 11 मेच्या रात्री सुरू झालेल्या या ऑपरेशनने माओवादी गटाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले.

अंधाधुंद गोळीबार

12 मे रोजी सकाळी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असताना माओवादी संघटनांनी पोलिसांवर अचानक हल्ला करत अंधाधुंद गोळीबार सुरू केला. मात्र, सी-60 कमांडोंनीही याचे जोरदार प्रत्युत्तर देत तिन्ही दिशांनी मोर्चेबांधणी करत जवळपास दोन तासांपर्यंत जोरदार चकमक केली. या चकमकीनंतर माओवादी गटाने जंगलाचा आड वापरून माघार घेतली.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या कमांड सेंटरमधून सुरक्षेचा नवा मंत्र

चकमकीनंतर परिसरात सखोल शोध घेतला असता माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा व अत्यावश्यक साहित्य जप्त करण्यात आले. यात एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, रेडिओ, वॉकीटॉकी चार्जर, तीन पिट्टू पिशव्या तसेच अन्य नक्षलविरोधी साहित्य समाविष्ट आहे. ही जप्ती त्यांच्या भविष्यातील घातपाताच्या योजनांना चाप बसवणारी ठरली आहे.

माओवाद्यांचे मोठे नुकसान

ही कारवाई म्हणजे गडचिरोली पोलिसांची प्रचंड यशस्वी रणनीतीची झलक आहे. चकमकीदरम्यान काही माओवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जंगलाच्या आडवाटांमध्ये घेऊन गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या या भागात सर्च ऑपरेशन सुरू असून संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

कवंडे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस ठाण्यामुळे या भागात पोलिसांची पकड मजबूत झाली असून, नक्षली हालचालींवर अंकुश आणण्यास याचा मोठा फायदा होत आहे. गडचिरोली पोलिसांची ही धडक कारवाई केवळ एक यश नव्हे, तर नक्षलवाद्यांच्या मनोबलावर मोठा आघात करणारी ठरली आहे.

विश्वास वाढवणारा पराक्रम

ही धाडसी कारवाई नागरिकांमध्ये सुरक्षा आणि विश्वासाचे नवे पर्व उघडणारी ठरली आहे. जंगलात नक्षल्यांचे छुपे अड्डे उद्ध्वस्त करत गडचिरोली पोलीस दल ‘अंत्यत धोकादायक’ समजल्या जाणाऱ्या भागातही निर्भयतेने कार्य करत आहे. या कारवाईने पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, सी-60 जवान आणि गडचिरोली पोलिस दल माओवाद्यांच्या पायाभूत रचनेवर प्रभावी आघात करत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!