महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : शिस्तीच्या मर्यादा ओलांडल्या तर कारवाई निश्चित

Shiv Sena : गायकवाडांना वादग्रस्त विधानाची मोठी किंमत

Author

एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करून मोठे वादंग उठवले आहे. या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

फडणवीसांनी गायकवाड यांना त्यांच्या सीमांची आठवण करून देत जागा दाखवली आहे अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यापूर्वीही संजय गायकवाड यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं करून वातावरण तापवले होते. मात्र या वेळी त्यांनी थेट राज्य पोलिस दलावर केलेल्या टिप्पणीमुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Harshwardhan Sapkal : उज्ज्वल निकमांच्या मानधनात बंधनाचा भेदभाव

तात्काळ निर्णय 

संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान करणे हे नवीन नाही. याआधीही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा टीका केली होती. मात्र पोलिस दलासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर अवमानकारक भाष्य केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. झेड प्लस आणि वाय प्लस सुरक्षा पुरवणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांविषयी केलेल्या असभ्य वक्तव्यामुळे तात्काळ कडक निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या माध्यमातून संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून स्पष्ट संदेश दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिस्तभंग पचवला जाणार नाही, असे देखील बोलले जात आहे. या निर्णायक कृतीने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पेटली आहे. सत्ताधाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक, मर्यादा ओलांडल्यास सक्ती बाळगण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांच्या कृतीतून दिसून येत आहे.

Devendra Fadnavis : तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाच्या योग्य वापरातून कार्यक्षमता

नाराजीचे वातावरण 

बुलढाणा दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत संजय गायकवाड यांना शिस्तीचा डोज दिला. भावनेच्या भरात बोलण्यापेक्षा जबाबदारीने वागण्याची आठवण करून देताना शिंदे यांनी स्पष्ट संकेत दिले की, पक्षशिस्त भंग करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. या घडामोडींमुळे शिंदे गटातही नाराजीचे वातावरण पसरले आहे. संजय गायकवाड यांच्या अनियमित वर्तनामुळे गटाचे नेतृत्व अडचणीत आले आहे. त्यांच्या प्रत्येक विधानामुळे पक्षाच्या प्रतिमेला धोका निर्माण होत असल्याचे आतल्या गोटात मानले जात आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात आपला कायद्याचा कटाक्ष ठामपणे दाखवून दिला आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. कोणताही आमदार, मंत्री किंवा नेता जर सीमोलंघन करेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा संदेश त्यांनी पुन्हा एकदा ठसवून दिला आहे. फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे पोलिस दलाच्या प्रतिष्ठेला संरक्षण मिळाले आहे. कोणत्याही प्रकारचे असभ्य वक्तव्य सहन केले जाणार नाही, याची प्रचिती सर्वांना आली आहे. फडणवीसांनी दाखवलेली ही भूमिका सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणात एक ठाम संदेश ठरत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!