महाराष्ट्र

Maharashtra : राज्याच्या विकासाला नवीन सूर, रेल्वे प्रकल्पाचा महापूर

Indian Railways : महाराष्ट्रात झुकझुक गाडीचा सुवर्णकाळ उजडतोय 

Post View : 21

Author

महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला ऐतिहासिक गती मिळाली आहे. केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांच्या भव्य प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील पायाभूत सुविधा भक्कम होतील आणि विशेषतः विदर्भ व मुंबईसारख्या भागांना मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने एक लाख 73 हजार कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात रेल्वे जाळ्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार आहे. विशेषतः विदर्भासारख्या मागास भागाला मोठा लाभ होणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेत लक्षणीय सुधारणा होणार असून नव्या वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण नव्या रेल्वे मार्गांची घोषणा केली. गोंदिया-बल्लारशाह आणि जळगाव-जालना हे दोन नविन रेल्वे मार्ग लवकरच तयार होणार असून, यामुळे संबंधित भागांची कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच, कल्याण ते आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे काम लवकरच सुरू होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या उपनगरीय सेवेला दिलासा मिळेल आणि दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल.

विदर्भ प्राधान्य

मुंबईतील एसी लोकल सेवा अधिकाधिक प्रवाशांसाठी उपलब्ध व्हावी यासाठी त्याच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची बचतही होणार आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील रेल्वे जाळ्याचा वेगाने विकास करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला पूर्ण पाठबळ दिलं जाईल.

Prakash Ambedkar : महात्मा फुलेंच्या चित्रपटावर सेन्सॉरची कात्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या या निधीमुळे महाराष्ट्रात रेल्वे क्षेत्राचा व्यापक विकास होणार आहे. विशेषतः विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहेत. रोजगारनिर्मितीपासून ते आर्थिक विकासापर्यंत अनेक सकारात्मक परिणाम या प्रकल्पांमुळे दिसून येतील, असे फडणवीस म्हणाले.

सोयीस्कर प्रवास 

गोंदिया-बल्लारशाह हा नविन रेल्वे मार्ग विदर्भासाठी क्रांतिकारक ठरणार आहे. यामुळे त्या भागातील उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य सेवा यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल. या मार्गामुळे स्थानिक जनतेला अधिक जलद आणि सोयीस्कर प्रवास शक्य होणार असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनमानावर होणार आहे.

राज्यभरातील विविध रेल्वे प्रकल्पांचा वेगाने पाठपुरावा केला जात आहे. अनेक प्रकल्पांच्या कामांना आता गती मिळाली आहे. मुंबईसारख्या महानगरातही अनेक महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प राबवले जात असून, शहरातील वाहतूक समस्येवर यामुळे तोडगा मिळेल. तसेच, ग्रामीण भागांमध्येही रेल्वे पोहोचल्यामुळे तेथील नागरिकांना शहरांशी अधिक चांगले जोडले जाण्याचा मार्ग मोकळा होईल.

महाराष्ट्रात या प्रकल्पांमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. पायाभूत सुविधा निर्माण होणं हे आर्थिक प्रगतीचं प्रमुख द्योतक असतं आणि याच दिशेने महाराष्ट्र वेगाने वाटचाल करणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रेल्वे विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

अभिजित कराळे | Abhijeet Karale

अभिजित कराळे | Abhijeet Karale

पत्रकारिता, बातम्या हा अभिजित यांच्या आवडीचा विषय. पत्रकारितेचा कोर्स केला नसला तरी त्यांनी न्यूज रिपोर्टिंगच्या आवडीतून त्यांनी आपलं लेखन कौशल्य विकसित केलं. ‘द लोकहित लाइव्ह’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतील आपला प्रवास सुरू केला. पुण्यातून त्यांनी संगणशास्त्र, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!