प्रशासन

Chandrapur : माजी नागरसेवकाने आयुक्तांच्या गाडीवर उधळले पैसे

Pappu Deshmukh : महापालिकेच्या दारात जोरदार आंदोलन

Post View : 30

Author

चंद्रपूरमध्ये माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी शहरातील खराब रस्ते, धुळीचा त्रास आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा निषेध म्हणून महापालिका आयुक्तांच्या गाडीवर पैसे उधळले.

चंद्रपूर शहरात रस्त्यांची दुरवस्था, धुळीचा त्रास, अनावश्यक खोदकाम सुरु आहे. महानगरपालिकेतील घोटाळ्यांविरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करताना त्यांनी थेट आयुक्तांच्या गाडीवर पैसे उधळले. हे आंदोलन केवळ एक निषेध नव्हता, तर चंद्रपूरकरांच्या मनातील रोषाचा एक आवाज होता.

शहरात सुरू असलेल्या पाईपलाइन खोदकामामुळे संपूर्ण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धुळीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच, महानगरपालिकेकडे निधी नसल्याचे कारण दिले जात आहे. मग घोटाळ्यांसाठी पैसे कुठून येतात? याच प्रश्नावर पप्पू देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट कारवाईचा निर्णय घेतला.
महानगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे.

Nagpur : मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट, वाहतूक नियंत्रण ठेवणार अप टू डेट 

पाण्याचा प्रश्न

पाईपलाइन खोदकाम, भूमिगत गटार योजना, अमृत पाणीपुरवठा योजना यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण नागरिकांना कोणताच फायदा झाला नाही. 15 वर्षांपूर्वी शंभर कोटी रुपयांची गटार योजना आखली गेली, ती अर्धवट राहिली. आता 506 कोटींच्या नव्या योजनेसाठी तयारी सुरू आहे. अमृत पाणीपुरवठा योजनेत 234 कोटी रुपये खर्च झाले, तरीही चंद्रपूरकरांना पुरेसं पाणी मिळालं नाही.

एवढ्यावरच न थांबता आता 270 कोटी रुपयांची नवीन योजना आणली जात आहे. 20 वर्षांपासून शहरात रस्ते बनवण्याऐवजी फक्त खोदण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत, असा आरोप केला जात आहे. शहरातील नागरिकांना होणाऱ्या या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पप्पू देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी महानगरपालिकेसमोर अनोखे आंदोलन केले.

Anil Deshmukh : हॉस्पिटलने डावलला थेट मंत्रालयाचाही आदेश 

मुख्यमंत्र्यांना पत्र

निषेध म्हणून त्यांनी थेट आयुक्तांच्या वाहनावर पैशांची उधळण केली. याचा अर्थ स्पष्ट होता महानगरपालिका घोटाळ्यांसाठी पैसा उधळू शकते, पण जनतेच्या गरजा भागवण्यासाठी मात्र निधी नाही. यावेळी महास्वाक्षरी अभियान राबवून सह्यांचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठवले जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. हा लढा केवळ निषेधापुरता मर्यादित नाही. शहरातील नागरिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी घेतलेला एक ठोस निर्णय असल्याचे पप्पू देशमुख यांनी सांगितले.

अभिजित कराळे | Abhijeet Karale

अभिजित कराळे | Abhijeet Karale

पत्रकारिता, बातम्या हा अभिजित यांच्या आवडीचा विषय. पत्रकारितेचा कोर्स केला नसला तरी त्यांनी न्यूज रिपोर्टिंगच्या आवडीतून त्यांनी आपलं लेखन कौशल्य विकसित केलं. ‘द लोकहित लाइव्ह’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतील आपला प्रवास सुरू केला. पुण्यातून त्यांनी संगणशास्त्र, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!