महाराष्ट्र

पालकमंत्री पदाचा पेचा आता सुटणार; Chandrashekhar Bawankule यांचे संकेत

Makar Sankranti नंतर महायुतीची पतंग उंच उडणार

Share:

Author

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यानंतरही पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी पाकलमंत्री पदावरील तिढा निकाली काढणे गरजेचे झाले आहे. 

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरही पालकमंत्री पदासाठी नाव निश्चित झालेले नाहीत. अनेक जिल्ह्यांसाठी वेगवेगळे मंत्री दावेदारी करीत आहेत. कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकत्व मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. प्रजासत्ताक दिनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात तोडगा काढावा लागणार आहे. मकर संक्रांतीनंतर या विषयावर तोडगा निघेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दोन दिवसात पालकमंत्री वाटपाचा घोळ संपणार असे संकेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पालकमंत्री ठरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याकडे दिली होती. महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी ते चर्चा करणार होते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत सूत्र ठरल्याचं निश्चित मानलं जात आहे. त्यामुळं संक्रांतीत पालकमंत्री पदाचा पेच सुटेल. त्यानंतर महायुतीची पतंग आकाशात पूर्ण ताकदीनं झेपावेल, असं सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबाबत Amruta Fadnavis स्पष्टच बोलल्या

कोणताही Dispute नाही

महायुतीमधील घटक पक्षात कोणतेही मतभेद नाही. तीनही पक्षांशी चर्चा केल्यानंतर पाकलमंत्री ठरविण्यात आले आहे. दोन दिवसात याची घोषणा करण्यात येईल, असंही बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन बैठकी घेतल्या. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील होते. त्यात पालकमंत्री पदाचा निर्णय जवळपास झालेला आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय जाहीर केला जाईल, असंही बावनकुळे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप तयार आहे. जेव्हा निवडणुका लागेल, पूर्ण ताकदीने मैदानात उतरू, असंही त्यांनी सांगितलं.

महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांसोबत जाऊन काम करू. भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष आहे .पण महापालिका निवडणुकीत आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाऊ, असं बावनकुळे म्हणाले. बीड येथील प्रकरणावरही बावनकुळे यांनी भाष्य केलं. 14 तारखेला आपण सुरेश धस यांच्याशी चर्चा करणार आहोत. धनंजय मुंडे दोषी असतील तर सरकार कारवाई करेल, असंही बावनकुळे म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जनतेनं सहकार्य करावं, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतही बावनकुळे यांनी स्पष्ट संकेत दिले. लाडकी बहीण योजना सुरू राहील. कारवाई होणार नाही. मात्र नियमाच्या बाहेर कोणी लाभ घेतल असेल तर तो बंद होईल, असंही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!